धानोरा ग्रामस्थांतर्फे तुषार तरटे यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक पदी निवड; जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले यश

धानोरा ग्रामस्थांतर्फे तुषार तरटे यांचा सत्कार




पोलीस उपनिरीक्षक पदी निवड; जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले यश

तेजवार्ता


धानोरा | तेजवार्ता न्यूज :
धानोरा येथील तुषार सविता सुभाष तरटे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल गुरुवारी धानोरा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तुषार यांनी हे यश संपादन केले आहे.

अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या तुषार तरटे यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. सध्या ते पोलीस खात्यात शिपाई पदावर कार्यरत असून, नोकरी सांभाळत खातेअंतर्गत MPSC परीक्षेची तयारी करून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले.

धानोरा येथे आयोजित सत्कार समारंभात परमेश्वर काका शेळके, डॉ. संजय काळे, भगवान काळे, शिवाजी ढोबळे , राजु मास्टर , डॉ . काकडे , नागनाथ काळे, सुभाष शेळके, देविदास उदावंत, संतोष काळे, राहुल शेळके, संतोष शेळके, दादासाहेब चव्हाण, गणेश काळे, कुंडलीक काळे, कैलास काळे, सोनबा काळे , नवनाथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना तुषार तरटे म्हणाले की, “ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास केला पाहिजे. मेहनत घेतली तर यश निश्चित मिळते.”


VDO News पहा👇📽️📡📺



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.