साबलखेड येथे विकास कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलली विशेष पथकाची नियुक्ती करून सखोल चौकशी करण्याची भरत गाडे व ग्रामस्थांची मागणी

 साबलखेड येथे विकास कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलली
विशेष पथकाची नियुक्ती करून सखोल चौकशी करण्याची भरत गाडे व ग्रामस्थांची मागणी 



आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील साबलखेड येथे विविध विकास कामे न करताच कोट्यावधी रुपयांची बोगस बिले उचलली असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. या संबंधी साबलखेड येथे शुक्रवार दिनांक 24 रोजी झालेल्या ग्रामसभा मध्ये प्रश्न विचारले असता ग्रामसेविका व सरपंच यांना एक ही उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामसभा आटोपती घेऊन पळ काढल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध केला. सदरील बोगस बिले उचलणाऱ्या अधिकारी कर्मचारी व संबंधितावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भरत गाडे व ग्रामस्थांनी बुधवार दिनांक - 06 मे 2026 रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती आष्टी,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

कराळे वस्ती येथील जि प शाळेत पेव्हिंग ब्लॉक बसवणे (1,80,000/-), साबळेवस्ती व कराळेवस्ती जि प शाळेस कलर करणे (1,89,768/- ), ग्रामपंचायतसाठी फर्निचर खरेदी करणे (2,00,000/-), जिल्हा परिषद शाळा साबलखेड डिजिटल करणे (1,00,000/-), अंगणवाडी खेळणी खरेदी करणे (1,35,643/-), अंगणवाडी साठी साहित्य खरेदी करणे (76,690/-), हॅन्ड वॉश स्टेशन साबलखेड (1,50,000/-), ग्रामपंचायत साबलखेड येथे कॉम्प्युटर्स बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी करणे (1,88,000/-), कराळेवस्ती व साबळेवस्ती येथे जि प शाळेस कलर करणे (1,87,764/-), साबलखेड येथे ग्रामपंचायत अंतर्गत सोलर खरेदी (1,00,000/-), अंगणवाडी साहित्य खरेदी (79,790/-), ग्रामपंचायत अंतर्गत गावात एलईडी खरेदी करणे (80,000/-), अंगणवाडी इमारत दुरुस्ती करणे (1,74,073), आपले सरकार सेवा केंद्र साबलखेड (1,57,929/-), साबलखेड ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट बेंच बसवणे (74,476/-), झेरॉक्स मशीन खरेदी (65,000/-), श्रीराम कन्स्ट्रक्शन च्या नावे बिल आदा केले (2,52,021/-), साई इंटरप्राईजेस च्या नावे बोगस बिल काढले (2,43,000/-), उत्कर्ष शिवाजी ओंकार च्या नावे बोगस बिल काढले (2,21,841/-), घनकचरा व्यवस्थापनासाठीचा खर्च (2,00,457/-), मुस्लिम कब्रस्तान मध्ये पेव्हिंग ब्लॉक न बसवताच बिल काढले (4,44,449/-), जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वरील खर्च (प्ले ग्राउंड 6,45,024/-), साबलखेड गावासाठी तीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून गावात पाणीपुरवठा होत नाही (64,10,773/-) असे कोट्यावधी रुपयाचे  बील उचललेले आहेत. 

वरील सर्व विकास कामाचे विशेष पथकाची नियुक्ती करून सखोल चौकशी करावी व ग्रामपंचायतने मूलभूत सुविधा व भौतिक सुविधेवर खर्च न करता रंगरंगोटी, आवश्यक खरेदी दाखवून बोगस बिले उचलण्यात आलेली आहेत, काही कामावर डबल खर्च दाखवून पैसे उचलण्यात आलेले आहेत. सरपंच व ग्रामसेविका यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भरत गाडे व  गावातील 30 ग्रामस्थांच्या सहिने  गटविकास अधिकारी आष्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.