चिंचोली येथे निरंकारी संत सत्संगाचे आयोजन
आष्टी | प्रतिनिधी
धन निरंकार जी सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने चिंचोली येथे निरंकारी संत सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सत्संग शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे स्थळ चिंचोली महादेव मंदिर, धानोरा, जामखेड रोड, ता. आष्टी, जि. बीड येथे आहे.
“आत्म मंथन” या संकल्पनेवर आधारित या सत्संगामध्ये अध्यात्म, मानवता, सदाचार आणि समाजात प्रेम व बंधुभाव वाढविण्याचा संदेश दिला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सत्संग समाप्तीनंतर सर्वांसाठी ब्रह्मज्ञानाची माहिती व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


stay connected