*दहा लाख रुपयाचा कोट घालणारा फकीर विश्वगुरू देशवासीयांनी काय खावं काय घ्यावं सांगायलाय-लज्यास्पद?पंधरा लाख बँक खात्यात जमा करणार असल्याचा कथित प्रवास तेल खाऊ नका अन सोन घेऊ नका वर येऊन थांबला? लुटारू, फेकाड्या चा जाहीर निषेध-डॉ जितीन वंजारे*
सत्तेत येण्यासाठी किती खोटं बोलावं किती फेकाड्या माराव्या काय गप्पा कराव्या हे येथील नराधमांकडून शिकण्याजोग आहे. देशाच्या उच्च पदासाठी आणि देशातील सत्ता गिलांकृत करण्यासाठी जो हास्यास्पद 56 इंची छाती वाढवण्याचा येथील टीव्ही मीडियाचा प्रयत्न आहे तो बघून अक्षरशा लाज वाटते आहे. भारतीय मीडियाने इतकी स्वतःची इज्जत घालून घेतलेले आहे की एक छोटा देश पाकिस्तान या सोबत झालेल्या युद्ध संदर्भात अख्खा पाकिस्तान उडवल्याच्या बातम्या त्यांनी दिल्या ज्याची गाढवाची अक्कल नाही अशांना सिंहाचे कातडं घालून वाघ बनवण्याचा जो मीडियाचा प्रयत्न आहे तो पाच किंवा दहा वर्षांनी सपशेल फेल झाल्याचे दिसून आलेला आहे.स्वतःला विश्वगुरु म्हणून इतकं लज्जास्पद काम केल हे पाहवत नाही.अर्थव्यवस्थेला गेलेले तडे, देशातील चालू असलेली महागाई, असमानता, जातीयवाद, धर्मवाद,इपस्टीन फाईल मध्ये केलेले कारनामे झाकण्यासाठी अमेरिकेसारख्या देशाचा इतका दबाव की आपल्या देशासाठी लागणारे पेट्रोल डिझेल इतर इंधन सुद्धा कोणाकडून घ्यायचं याचा रिमोट कंट्रोल अमेरिका आहे.अशा फेकाड्या घाणेरड्या आणि देश लुटारू व स्वार्थासाठी देश गहाण ठेवणाऱ्या व्यक्तीला बादशाह म्हणून येथील मीडिया जे संबोधन करत आहे ते लज्जास्पद आहे. तो राजा नसून गुलामी करणारा भित्रा गुलाम आहे.मीडिया पत्रकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ असतात लोकशाही वाचवण्यासाठी येथील मीडिया महत्त्वाचा असतो परंतु एक पत्रकार, अभ्यासू व्यक्ती आणि सच्चा नेता आणि विरोधी पक्ष जर गुलाम झाले तर देशाचे किती वाटोळ होऊ शकतं हे सध्या भारताकडे पाहून लक्षात येत आहे. सुटा बुटा वाल्यांचा गुलाम झाल्यास विश्वगुरू कसा फकीर होतो याच उत्तम उदाहरणं हा देश आहे.शेजारील असणारा नेपाळ या देशांमध्ये नवतरुणांनी क्रांती केली तीच क्रांती भारतामध्ये होण्याची अपेक्षा आहे फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी देश जाळायचा आणि घर जाळून कोळशाचा धंदा करायचा हीच परिस्थिती आज देशामध्ये आहे. सर्वच्या सर्व शासकीय कंपन्या ज्या इतर सरकारने गेल्या 70 वर्षांमध्ये निर्माण केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व कंपन्या धनदांडग्यांना विकून देश विक्रेता शेठ मोकळा झालाय.जसे की एखाद्या बापाची संपत्ती असते आणि पेताड व अय्याश मुलगा ती थोडी थोडी विकून आयाशी करतो अशा पद्धतीचं आरबीआय कडे असणार सरकारी तिजोरीतलं सोन आणि येथील मंदिरामध्ये असणारे सोन चमत्कारिकरित्या कायम झालेला आहे. देश कंगाल झाला आहे. स्वार्थासाठी खजिना वापरला आहे.देशातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की इंधन पेट्रोल डिझेल गॅस तेल आणि सोनच खरेदी करू नका पेट्रोल डिझेल खरेदी करू नका.इतकी वाईट परिस्थिती गेल्या 70- 75 वर्षांमध्ये कधीही या देशाची झालेली नव्हती याला कारण सूटबुटातील लोकांचं, धन दांडग्यांचं कर्ज माफ करून तो बोजा येथील सामान्य माणसावर टाकला गेलाय.अशा कितीतरी कंपन्या आहेत ज्यांच्यावर असणार कर्ज या फेकाड्याने माफ केला आहे. येथील धार्मिक भोळ्या भाबड्या जनतेकडून धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर आणि संसर्गजन्य रोगाच्या नावावर फंड तयार करून पैसा मागवला गेला या पैशाचा एकही हिशोब दिलेला नाही. जीएसटी, पर्सनल टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, बिझनेस टॅक्स, कस्टमर टॅक्स, सेल टॅक्स अशी सगळ्याच प्रकारची कर वसुली करून येथील नोकरदार वर्ग व उद्योगपती सर्रास लुटले गेले या सर्वांचा बोजा सर्वसामान्यावर पडला देशामध्ये महागाई प्रचंड शिगेला पोहोचली, त्या तुलनेने रोजगार निर्मिती उत्पन्न झाली नाही, नवनवीन उद्योगधंदे येथे तयार होईनात. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना येथे सर्रास फेल झाल्या.गरज नसताना बुलेट ट्रेन, गरज नसताना एसी ट्रेन आणि सर्वसामान्यांची लोकल बंद पाडण्याचं षडयंत्र येथील धन-दांडग्यांचे गुलाम फेकाड्या वृत्तीचे लोक करत आहेत याचा मी माननीय सम्राट डॉक्टर जीतीनदादा वंजारे खालापुरीकर एक नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो. देशांमध्ये वीज कर जास्तीचा वसूल केला जात, शेतकऱ्यांना वीज माफी नाही, कर्जमाफी नाही, विमा आता बंद केला आहे, डिजिटल मीटर दाखवून सर्रासपणे ग्राहकांची लूट केली जात आहे. युद्धाचे कारण सांगून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, पेट्रोल डिझेल अन गॅस चें भयानक प्रमाणात दर वाढवलेले आहेत आणि या सर्वांचा परिणाम येथील सामान्य जनतेवर होत आहे परंतु बोलायचं कुणी? विरोधी पक्ष नेता पण गप आहे कारण त्याने पण भ्रष्टाचार केलेला आहे.कोणी काही बोलायला गेलं की त्याचा भ्रष्टाचार काढून ईडी सीबीआय ची भीती घालून आपल्या पक्षात एंट्री दिली जातं आहे आणि विरोधक कमजोर केला जातं आहे. इव्हीएम हटवत नाहीत करे तो करे क्या? आवाज उठवेल त्याला जेलमध्ये टाकलं जातं आहे ही नीती वापरून स्वतःच्या पक्षांमध्ये इन्कमिंग केली. भ्रष्टाचारी सर्वच्या सर्वच इतर पक्षातील नेते दबाव तंत्र वापरून स्वतःच्या पक्षांमध्ये घेऊन गुंड,मुजोर,भ्रष्टाचारी, अनैतिक सर्वच गुन्हेगारी वृत्तीचे लोक सोबत घेऊन देशात सत्ता चालवणारा फेकाड्याचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे. बाहेरच्या देशामध्ये दौरे करून येथील उद्योगपतींचे साटे-लोटे व सेटिंग तेथील गव्हर्मेंटशि जुळवून देण्याचा जो दलालीपणा सर्रासपणे चालू आहे अशा दलाली लोकांना सत्तेतून काढून टाका असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यास माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या पूर्णच्या पूर्ण आरोपींचे एकांनंतर एक सर्वांची निर्दोष सुटका केलेली आहे मग बॉम्ब कोणी टाकला होता?येथील कोर्ट स्वतःच्या दबावात घेतल्याने बलात्कार करणाऱ्यांना सर्रास जामीन होत आहे?दोन नंबर धंदे खून खराबा करणाऱ्यांना जमानत मिळत आहे? आणि खऱ्या लोकांना जेल भोगावे लागत आहे? प्रिव्हेट पार्ट ला हाथ लावणे बलात्कार नाही अशी येथील कोर्ट आरोपीची पाठराखण करत आहे.रामराज्याच्या नावाखाली येथे सर्रासपणे गुंडांचे राज्य,अनैतिकतेचे राज्य स्थापन केलं जात आहे.राम मंदिर बांधून मी रामापेक्षा मोठा आहे असा आव आणला जातं आहे.धर्म अन जातीच्या अडून राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातं नाही. नव्या संसदेत पूजेला बसू दिल जातं नाही.धर्माच्या नावाखाली विशिष्ट संघटना तयार करून वेगळा दबाव येथे निर्माण केला जात आहे. बोलणारच तोंड दाबलं जात आहे मीडिया स्वतःच्या खिशात वापरला जात आहे. कालपर्यंत राष्ट्रहिताच्या बाता करणारा रात्रीतून पक्ष बदल करून खोटारड्यांच्या तंबूत शिरताना दिसत आहे. मग जुने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले माणसं कोणत्या वॉशिंग मशीन नुसार शुद्ध होऊन तुमच्या पक्षांमध्ये मंत्री बनत आहेत हा जनतेला पडलेला प्रश्न आहे? तुमचं कोणतं आश्वासन सत्य झालेला आहे. शंभर स्मार्ट सिटी,गंगा यमुना शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, शेतकऱ्यांची दुप्पट इन्कम, लाखो नोकऱ्या, महागाई कमी करणार, शुद्ध जल, बेटी बचाव बेटी पढाव, हंगर इंडेक्स,पंधरा लाख, काळा पैसा, घरकुल, कनेक्टिव्हीटी,समानता ह्यापैकी काय केल तुम्ही. सगळे मुसळ केरात.फक्त राशन अन भाषण शिवाय दिल काय तुम्ही? फक्त फेक्या मारल्या.गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये राष्ट्राची प्रगती नाही तर अधोगती झालेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाहीये, महागाई चरण सीमेवरती आहे, नोकरीचा पत्ता नाहीये, आर्मीमध्ये पूर्ण काळ नोकरी नाही देशाची संरक्षण यंत्रणा कोलमडीस आणली आहे, परकीय देश आक्रमण करत आहेत आणि स्वयंघोषित 56 इंची छाती वाला फकीर नुसताच परदेश दौरे करून छाती बडवत आहे, याचा उद्रेक आज ना उद्या होईल कारण सतयुगाची सुरुवात झालेली आहे. येथे असत्य झाकणार नाही.सत्य तेवत राहील,देवधर्माच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली लोक फकीर म्हणून पैसा लुटत आहे, त्याला शासन झाल्याशिवाय राहणार नाही. येथे सर्रासपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे तरीही शेतकऱ्याला कर्जमाफी होत नाही परंतु येथील धन दानग्यांच्या कंपन्यांना हजारो कोटींचे कर्ज माफ होत आहे आणि हा करणारा शेठ गुलाम असल्यासारखं वागत आहे. येथील आया बहिणींवर दिवसाढवळ्या अत्याचार, अन्याय अन बलात्कार होत आहे, खरात सारखा भोंदू बाबा चालीस आमदार खासदार च्या पत्नीना कॅमेरात टेबल वर घेत आहे,येथील सत्तेतील 40 आमदार खासदारांवर बलात्काराचे सिद्ध आरोप आहेत परंतु ते मोकाट बाहेर हिंडत आहे, ह्याला सर्वस्वी आशीर्वाद देणारा शेठ दमदाटीचे आणि हुकूमशाहीची येथे सत्ता चालवत आहे परंतु नियतीचा खेळ पळटेल, यंग जनरेशन तयार होईल कारण ही संतांची भूमी आहे,ही सत्याची भूमी आहे, यांचा विनाश आणि नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. जातीजातीत धर्मा धर्मात भांडणे लावत आहे,दहावीस लाख झाड लावण्याचा प्रयत्न करणारे दहा दहा कोटी वृक्षतोड करत आहेत. येथील जंगल आणि गायराने सर्रासपणे उद्योगपतींना एक रुपया एकर प्रमाणे दिली जात आहेत. गोरगरिबांची गायराने हडप केली जातं आहेत.येथील आदीवाशांना बुलडोजर खाली तुडवलं जात आहे,इतका निर्दयी राजा कसा असू शकतो? ज्याला इलेक्शन मध्ये प्रचार अन विदेश दौरे जमतात पण येथे लोकांची दुःख दूर करता येत नाहीत. मणिपूर अजूनही जळत आहे.एखादा राज्यामध्ये स्त्रियांवर सर्रासपणे बलात्कार होऊन लाखो स्त्रिया मारल्या जातात. एका दिवसांमध्ये लाखो स्त्रिया बेपत्ता होतात, देशांमध्ये लाखो आदिवासी दलितांना मारलं जात आहे. देशांमध्ये लाखो आया बहिणींवर बलात्कार केला जात आहे.पण 56 इंचाचा फेकाड्या नुसताच बाता मारत आहे बेटी बचाव बेटी पढाव अरे इतका निर्दयी कसा असू शकतो माणुस.स्वतःला फकीर म्हनवणाऱ्या लोकांमध्ये दहा लाखाचा कोट एका कार्यक्रमांमध्ये दहा दहा वेळेस पोशाख बदलणाऱ्या रंग बदलून गिरकिटाने आता तरी सुधरावे. येथील अंध भक्त गोबर भक्त यांनी गाढवाला वाघाचं कातड घालून त्याला नकली वाघ बनवून जनतेसमोर आणलं परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये गाढव गाढव सिद्ध झालं आपण विश्वगुरू आहेत असा डंका जगामध्ये पेटवणारा विश्वगुरू तेल खाऊ नका?डिझेल वापरू नका?पेट्रोल वापरू नका? यात्रा ला जाऊ नका? घरीच रहा गॅस वापरू नका खाद्यतेल वापरू नका आणि सोनं तर आजीबातच घेऊ नका अशा व्हलगना करायला लागला अरे अंध भक्तांनो आता कुठे गेला तुमचा बाप? विश्वगुरू? देशाला ही परिस्थिती आज पर्यंत किती जण राजे अन महाराजे होऊन गेले त्यांच्या कार्यकाळामध्ये झाली नाही परंतु आज देशवासीयांना सांगावं लागत आहे की तुम्ही काय खावं आणि काय घ्यावं काय वापरावे.याचा अर्थ तुम्ही सपशेल फेल मॉडेल ठरलेला आहात हे मान्य करा आणि नैतिकतेने या देशातील जे लोक पद भोगत आहेत त्यांनी नैतिकतेने राजीनामे द्यावे,याने स्वतःचे दौरे बंद करावे, हजारो गाड्यांचे ताफे घेऊन शक्तिप्रदर्शन करू नये, विमान उड्डाणं बंद करावीत, तडीपार गुंडे अनपढ बलात्कारी लोक संसदेत घेऊ नये, आमदार, मंत्री, खासदारांच्या सेक्युरिटी, तामझाम बंद करावा, सायकल सवारी चालू करावी आणि हे सगळं स्वतःसून करावे, हा मोकाट फिरेल अन देशवासियांनी का सजा भोगावी असे जाहीर आव्हान मी एक सामाजिक कार्यकर्ता तथा देश हितचिंतक जबाबदार नागरिक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर करतो.जयसंविधान,जयभारत.

stay connected