विश्वशांती बौध्द विहाराच्या नामफलकाचे उदघाटन
लोहा :-चंद्रकांत वाघमारे
जायकवाडी वसाहत येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विश्वशांती बौध्द विहाराच्या नियोजीत जागेच्या नामफलकाचे उदघाटन . करन्यात आले
लोाहा शहरातील कंधार रोड वरील जायकवाडी वसाहत येथे आज.महामानव भारतरत्न परमपुज्य बोध्दीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त जायकवाडी येथील विश्वशांती बौध्दविहाराच्या नियोजीत जागेच्या नाम फलकाचे उदघाटन करन्यात आले.उदघाटना पुर्वी तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करन्यात आले तदनंतर महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा वंचीत बहुजन आघाडीचे मार्गदर्शक बी.बी.गायसमुद्रे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहन करन्यात आले.त्यानंतर नगरपरिषदेच माजी नगरसेवक बबनराव निर्मले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.बी.महाबळे यांच्या हस्ते विश्वशांती बौध्द विहाराच्या नियोजीत जागेच्या नामफलकाचे फित कापून उदघाटन करन्यात आले .
यावेळी महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा वंचीत बहुजन आघाडीचे मार्गदर्शक बी.बी.गायसमुदे,जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक केतन खिल्लारे, प्रा.राजेश ढवळे,माजी नगसेविका पुष्पलता कापुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.बी.महाबळे,रतन हंकारे, गो विस्डम कंपनीचे (पुणे )युवा उद्योजक कुणाल गायसमुद्रे, सरिता ऑन लाईन कंपनीचे संचाालक विशाल गायसमुद्रे,अनिलदादा गायकवाड,यशपाल निर्मले ,नवनाथ आढाव,शिध्दार्थ ससाणे, श्यामसुंदर वाघमारे,ज्योती सावळे, गौतम वाघमारे,शेषराव हंकारे,गौतम कांबळे, परमेश्वर सोनकांबळे , तुकाराम गायकवाड, लक्ष्मण कांजले, गोपीनाथ नंदेवाड, गणेश फुलवळे,त्रंबक वाघमारे,संगीता ढवळे,जयश्री वाघमारे,संगीता गायसमुद्रे,राणी हंकारे,माजी सरपंच संगीता वाघमारे,वैशाली कांबळे, वर्षा वाघमारे,माजी सरपंच अंकुश वाघमारे,वंदना मस्के,तुकाराम गायकवाड,राजेंद्र कांबळे, विश्वनाथ कांबळे,सुप्रिया कांबळे,सागर कांबळे,उज्वला हंकारे,एैशर्या डोंगरे,राणी हंकारे, आदीसह मोठया संख्येने उपासक उपासिका उपस्थीत होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल गायकवाड यांनी केले तर आभार विशाल गायसमुद्रे यांनी मानले.


stay connected