📰 BEED | धानोरा रोड–लोकाशा नगर रस्त्याची दुरवस्था; AAPचा आंदोलनाचा इशारा
🗞️ बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील धानोरा रोड ते राजू नगर, अंकुश नगर व लोकाशा नगर मार्गे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पालवन–अंकुश नगर–कालिका नगर–लोकाशा नगर परिसरातील कॅनॉल रोडवर अतिक्रमण व बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू असल्याची तक्रार आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. सरकारी व ओपन स्पेस जमिनीवर कब्जा करून नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवावे, बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत तसेच संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीकडून देण्यात आला आहे.


stay connected