📰 ASHTI | सामाजिक कार्यकर्ते शाकीर कुरेशी यांचे हृदयविकाराने निधन
🗞️ आष्टी | तेजवार्ता वृत्तसेवा
आष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा कुरेशी संघटनेचे तालुका अध्यक्ष शाकीर युसुफ कुरेशी (वय ५३) यांचे गुरुवार (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री सुमारे ९ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या बंधू मोहसीन कुरेशी यांनी तत्परतेने उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शाकीर कुरेशी हे आष्टीतील एक सक्रिय आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करून श्रद्धांजली अर्पण केली.
यापूर्वी त्यांचे बंधू जाकीर कुरेशी, जे भाजपचे शहराध्यक्ष होते, यांचेही तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे एका कुटुंबातील दोन भावांचे अल्पावधीत निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.


stay connected