एकनाथ आव्हाड यांना हंबर्डे साहित्य पुरस्कार जाहीर
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,आष्टी जि.बीड आणि भाऊ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष कै.ॲड.बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृतिप्रतीर्थ सन 2025 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक,कवी एकनाथ आव्हाड यांना जाहीर झाला आहे.रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.एकनाथ आव्हाड हे बाल साहित्यिक,कवी,शिक्षक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.त्यांचे चाळीसहून अधिक बालकविता संग्रह,कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत 32 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.छंद देई आनंद या बाल कविता संग्रहाला भारत सरकारचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे.इंग्रजी,हिंदी,ब्रेल लिपीत त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे.10 राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाचे ते आजवर अध्यक्ष राहिले आहेत.त्यांच्या बालसाहित्यावर सध्या पाच विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत.शालेय आणि विद्यापीठ अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश राहिल्या आहेत.ॲड.बी.डी.हंबर्डे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार या अगोदर प्रभाकर साळेगावकर,सोपान हाळमकर,श्रीराम गिरी,संजय बोरुडे,दासू वैद्य,नागराज मंजुळे, अजीम नवाज राही,सिसिलिया कारव्हालो हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे आणि भाऊ फाउंडेशनचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी कवी,लेखक एकनाथ आव्हाड यांचे अभिनंदन केले आहे.


stay connected