कडा शहरात हजरत मौलाली बाबा यात्रा उत्सव 2026 उत्साहात होणार

कडा शहरात हजरत मौलाली बाबा यात्रा उत्सव 2026 उत्साहात होणार

कडा शहरात हजरत मौलाली बाबा यात्रा उत्सव 2026 उत्साहात होणार


कडा (प्रतिनिधी) – कडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ग्रामदैवत हजरत मौलाली बाबा यात्रा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

या उत्सवाची सुरुवात मंगळवार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हजरत मौलाली बाबा समाधी आंघोळ या धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे.

बुधवार, दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत .

गुरुवार, दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता गाव कंदुरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यानंतर शुक्रवार, दि. 1 मे रोजी बौद्ध पौर्णिमा यात्रा उत्सव, सायंकाळी छबीना मिरवणूक आणि पहाटे फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे.

उत्सवाचा समारोप शनिवार, दि. 2 मे रोजी सायंकाळी कुस्त्यांची दंगल (हंगामा) या पारंपरिक कार्यक्रमाने होणार असून हा कार्यक्रम मौलाली बाबा दर्गा परिसरात आयोजित करण्यात येणार आहे.

या संपूर्ण उत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ, कडा शहर यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.