लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची १० वी सी. बी. एस. ई. बोर्ड परीक्षेत गौरवशाली कामगिरी
कडा (प्रतिनिधी) येथील वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल या सी. बी. एस. ई. बोर्ड मान्यताप्राप्त शाळेचा १००% निकाल लागला असून शाळेतील ग्रीशा भंडारी ९६.२०% प्रथम क्रमांक , साक्षी ढोबळे ९२.६०% द्वितीय क्रमांक, विराट पालकर९१.६०% तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर १३ विद्यार्थ्यांनी ८० % पेक्षा जास्त गुण संपादन करून विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला यशाचे फळ मिळाले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित राठोड, उपाध्यक्ष श्री. संदीप चानोदिया, सचिव श्री. हेमंत मेहेर, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी श्री. मनीष गांधी, श्री. प्रकाश श्रीश्रीमाळ, श्री. अमोल पटवा, श्री. संजय पितळे, श्री. संतोष गांधी, मुख्याध्यापक श्री. के. अभिलाष , सल्लागार श्री. पी.जी. मेहेर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


stay connected