*राज्यस्तरीय वाचन संस्कृती साहित्य पुरस्काराने... कथालेखक बाळासाहेब देशमुख सन्मानित*
अहिल्यानगर :- वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण श्रीरामपूर इंदिरानगर येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प डॉ. पुरुषोत्तम कोळपकर हे होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना ह भ प डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर म्हणाले
' साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये हे साहित्यिक साधना करत, तिला जीवननिष्ठा मानून, राज्यभरातील गुणी साहित्यिकांना प्रतिष्ठान तर्फे साहित्य पुरस्कार प्रदान करते. त्यांच्या निरपेक्ष वृत्तीतून आजवर अनेक नवोदित लेखकांनी भरीव वाटचाल करत , साहित्यामध्ये आपला नावलौकिक केलेला आहे. प्रतिष्ठानचे हे कार्य राज्यात सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल.'
याप्रसंगी व्यासपीठावर माजी प्राचार्य टी.ई. शेळके, ह भ प दत्तात्रय औताडे, साहित्यिक श्री सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजी काळे हे होते.
प्रारंभी श्रीसंत गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते, विजेत्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
कथालेखक कथाकथनकार श्री बाळासाहेब देशमुख यांना प्रा. एकनाथ आवटी ज्येष्ठ साहित्यिक यांच्या शुभहस्ते, राज्यस्तरीय वाचन संस्कृती सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार.. रंग माझा वेगळा कथासंग्रहास देऊन सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब देशमुख यांचे आजवर रंग माझा वेगळा, माणसे अशी.. अन् तशीही.., माणसे भिंगातून इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आजवर अहिल्यानगर जिल्ह्यात कथाकथनाचे पाचशे प्रयोग पूर्ण करत, राज्यस्तरा वर सत्तावीस कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्या कथांचे, विविध आकाशवाणी केंद्रावर, 120 प्रयोग प्रसारित झालेले आहेत..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलासराव तुळे यांनी,तर आभार प्रदर्शन डॉ. रामकृष्ण जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शिवाजी काळे, नितीन जोर्वेकर, सौ. प्रा. संगीता फासाटे कटारे, सौ.मंदाकीनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये यांनी बहुमोल सहकार्य केले.


stay connected