*अंबिकानगर ची भीमजयंती जगात भारी- डॉ जितीन वंजारे*
*दाविद देठे यांनी 135 केक कापून गावकऱ्यांसोबत भिमोस्तव साजरा केला.*
बीड प्रतिनिधि:- अंबिका नगर येथे भूतो न भविष्य अशी भीम जन्मोस्तव म्हणजेच भीम जयंती साजरी करण्यात आली . अंबिका नगर येथील भूमिपुत्र दाविद देठे यांनी 135 केक मुंबईहून ऑर्डर करून आपल्या गावी अंबिका नगर येथे सर्व गावकऱ्यांच्या समवेत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 135 केक कापून भीम जन्मोस्तव साजरा केला. 14 एप्रिल म्हणजेच भीम जयंती प्रत्येक भीमसैनिक आपापल्या गावांमध्ये अतिशय जल्लोषात ऊस्पूर्ततेने आणि आनंदमय वातावरणात साजरा करतो. पिढ्यानपिढ्या हजारो वर्षांपूर्वीची मनूवाद्यांची गुलामी कायमची दुरुस्त करून महामानव विश्वरत्न परमपूज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहून गुलामांना मोकळं केलं.शोषित, पिडीत, दलित,रंजल्या, गांजल्यांना माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य देणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे दलित शोषित पिडीतांच्या जीवनातील आनंदमय सोनेरी नवी पहाट होय.दलितांचा जणू पुनर्जन्म या महामानवाच्या उदयाने झाला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजे भीम जयंती ही अतिशय उत्साहाने वैचारिकतेने प्रबोधन पर कार्यक्रम ठेवून साजरी केली जाते.अंबिका नगर येथे दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी गायक थोरात यांचा भीम गीतांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला 13 एप्रिल 2026 रोजी रात्री संगीत खुर्ची आणि विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित केले होते.14 एप्रिल दिवसाची सुरुवात 135 केक कापून फटाका्यांची अतिशबाजी करून भीम जन्मोस्तव साजरा केला, यावेळी गावातील सर्व माता भगिनी, भीमसैनिक आणि अबाल वृद्ध उपस्थित होते. 14 एप्रिल रोजी सकाळी मोटार सायकल व फोर व्हीलर रॅली, समता ध्वज उभारणी, आणि चांदीच्या रथातून ढोल तश्याच्या गजरात अगदी जल्लोषात भीम जयंती साजरी केली.गावात विविध बॅनर बाबासाहेबांचे व भगवान गौतम बुध्दा्ची फोटो व मूर्ती ठेऊन मुख्य चौकात माणवंदना देण्यात आली. सर्व भीमसैनिकानी कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रम पार पाडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर , दावीद देठे,प्रभुशेट देठे, सुनील राजगुरू, रवी राजगुरू, राजू काळे, पिंटू सुर्वे,मुबारक शेख, अस्लमभाई शेख,विशाल देठे, भगवान डोळसे,,बाळू फुलमाळी,बाबासाहेब राजगुरू,रामदास देठे, किरण देठे, नवनाथ देठे, सिद्धार्थ राजगुरू,रोहित राजगुरू,मच्छिन्द्र मानकर, सुदर्शन गाडेपाटील, अर्जुन शिरसाठ, डॉ काळे सर, संजुकाका जोशी,राजू देठे,योगेश सोनवणे, महेश देठे,हर्षद देठे, बाबू खंडागळे,अनिकेत राजगुरू, नागेश सोनवणे,,अनिकेत बाळू राजगुरू, प्रथम राजगुरू, पिनू डोळसे, शिवाजी देठे, शशिकांत देठे, प्रतीक देठे, बाळू शिरसाठ, सचिन काळे,ऋषीं राजगुरू, दीपक राजगुरू,सोनू देठे, बाबुलाल मणियार, साहिल मणियार,गणेश देठे, राजू सोनवणे, युवक लिंबोरे,अशोक मिरपगार,प्रेम देठे,भिवसेन राजगुरू,इत्यादीसह अनेक भीमसैनिक, माता भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जितीन वंजारे तर आभार प्रदर्शन रमेश देठे यांनी केले तर कार्यक्रम बौद्धचार्य खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.


stay connected