नरेंदर कब मिलेगा सिलेंडर – राज्यव्यापी आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हा : बी.बी.गायसमुद्रे
लोहा - प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे आखाती देशात अमेरिका इस्त्रायल व इराण या देशात चालू असलेल्या युध्दाामुळे गॅस व पेट्राल डिझेल यांचा पुरवढा आखाती देशाातून कमी होत असल्यामुळे त्यांची टंचाई निर्माण झाली आहे .त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढीचा प्रश्न तीव्र झाला असून, केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’ या घोषणेखाली येत्या ६ एप्रिल २०२६ रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवणार आहेत.
या आंदोलनात जिल्ह्यातील रेस्टॉरंट मालक, भोजनालय व वसतिगृह चालक, छोटे हॉटेल व्यावसायिक, घरगुती गॅस वापरकर्ते तसेच एलपीजीवर चालणारे ऑटोचालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासोब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा वंचित बहुजन आघाडीचे लोहा येथील वंचित बहुजन आघाडी जेष्ठ मार्गदर्शक बी.बी. गायसमुद्रे माजी नगराध्यक्ष व्हि.के.कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.बी.महाबळे,ई.जे.बनसोडे,प्रा.राजेश ढवळे, अनिल गायकवाड, गौतम वाघमारे, श्याम वाघमारे, शेषराव हंकारे, श्रीमती ज्योती कालिदास सावळे,सौ ज्योती बाळासाहेब बुध्दे,किर्तीमाला महाबळे यांनी सयुक्त रित्या प्रसिध्द प्रत्रकाव्दारे करन्यात आले आहे.


stay connected