प्रज्ञा चौदाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपूरमध्ये नगर येथील लेखक कवी बाळासाहेब देशमुख सन्मानित

 *प्रज्ञा चौदाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपूरमध्ये नगर येथील लेखक कवी बाळासाहेब देशमुख सन्मानित*



अहिल्यानगर:- प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित 14 वे मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे संपन्न झाले. संमेलन अध्यक्ष पदी ज्येष्ठ कवी श्यामसुंदर गावकर मुंबई हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापिका देगलूरकर, प्रमुख अतिथी सौ अंजली डोळे पुणे,  उद्घाटक राज यावलीकर अमरावती हे होते.

साहित्य संमेलन प्रसंगी बोलताना संस्थापिका लीना देगलूरकर म्हणाल्या 'समाजामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये,वेगवेगळे कार्य अविरतपणे निष्काम पणे करत असतात. त्यांचे हे कार्य, समाजभान दिशादर्शक असते. अशा अशा साहित्यिकांची, मान्यवरांची मांदीयाळी ,आज संमेलन निमित्ताने पाहताना अभिमान दाटून येतो. इंटरनेट, मोबाईलचा अतिवापर टाळत, वाचन संस्कृतीला घराघरातून सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे. सर्व साहित्यिकांच्या साहित्यकृती पाहताना,वाचताना, त्यांना सन्मानित करताना , ऊर अभिमानाने भरून येतो.'

सदर साहित्य संमेलन मध्ये अहिल्यानगर येथील कवी लेखक श्री बाळासाहेब देशमुख यांनी 'शिकवण' ही रचना सादर केली. ग्रामीण भागातील आई-वडील आपल्या मुलांना संगोपन करताना संस्कार, संस्कृतीचे बाळकडू कसे दिले जाते. यावर त्यांनी भाष्य केले. 

सदर साहित्य संमेलनमध्ये ज्येष्ठ कवयित्री प्रमुख अतिथी सौ अंजली डोळे पुणे, कवी संमेलनाध्यक्ष दीपक करगुंटकर मुंबई. या मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आले..

बाळासाहेब देशमुख यांचे रंग माझा वेगळा, माणसे अशी.. अन् तशीही.., माणसे.. भिंगातून इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक अजित उबाळे यांनी केले. तर ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.