बेलगाव येथे सागर (आप्पा) धस यांच्या हस्ते सिमेंट रस्ता व सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन संपन्न

 बेलगाव येथे सागर (आप्पा) धस यांच्या हस्ते 
सिमेंट रस्ता व सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन संपन्न 



     आष्टी ( प्रतिनिधी )

तालुक्यातील बेलगाव येथे आमदार सुरेश धस (अण्णा) यांच्या प्रयत्नातून नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता व सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी युवक नेते सागर (आप्पा) धस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे, उपसरपंच सतीश पोकळे, माजी सरपंच जयसिंग पोकळे, ज्येष्ठ पत्रकार ॲड सीताराम पोकळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते कल्याणराव पोकळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शक श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे, भाऊसाहेब (दादा) पोकळे, माजी उपसरपंच सदाशिव (अण्णा) पोकळे, प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे, युवा उद्योजक प्रवीण वारे, उद्योजक ज्ञानेश्वर पोकळे,  माजी सरपंच सुनील ढोबळे, एकनाथ पोकळे, दगडू दादा पोकळे, गणेश खोटे, विक्रम बापू पोकळे, रवींद्र ढोबळे, दादासाहेब  पोकळे, पोपट खंडागळे, संपत पोकळे, शिवम पोकळे ,राजू खंडागळे, सुदाम पोकळे, शरद पोकळे दादासाहेब पोकळे ,मारुती सरोदे, शिवाजी पोकळे, काकासाहेब पोकळे, रामदास पोकळे ,शहाजी पोकळे ,राजेंद्र पोकळे, बाळू पाखरे, दीपक पोकळे, दादासाहेब खंडागळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     बेलगाव च्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी युवक नेते सागर आप्पा धस  यांनी दिले. प्राचार्य ढोबळे सर यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.