कड्यात विचारांचे दीप प्रज्वलित करणारी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात ---------------- महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'शिवानी'ने पटकवला प्रथम क्रमांक

 कड्यात विचारांचे दीप प्रज्वलित करणारी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
----------------
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'शिवानी'ने पटकवला प्रथम क्रमांक



-----------------

राजेंद्र जैन / कडा 

----------------

येथील अमोलक जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या अंगी दडलेली वक्तृत्वकला उजागर व्हावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रभावी मनोगतातून सामाजिक विचारांना उजाळा दिला. यामध्ये कु. शिवानी सुनील नाथ या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला, अभिषेक भारत दळवी द्वितीय, तर साक्षी संजय कर्डिले हिने तृतीय क्रमांक मिळवला.

विजेत्यांचा गौरव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज.मो. भंडारी, संस्थेचे कार्यकारी अधिकारी नवनाथ पडोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. सचिन ढगे, महेश वाघुले, ईश्वर खिलारे, मधुराणी दळवी, अक्षय औटी, अक्षय घायाळ, निखिल कस्तुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर याकरिता महाविद्यालयाच्या संचालकांचे सहकार्य लाभले.

-------%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.