मधुकर ढोले उर्फ कुमार टेलर यांचे निधन
----------------
कडा / वार्ताहर
---------------
येथील जैन समाजातील ज्येष्ठ नागरिक मधुकर विलास ढोले उर्फ कुमार टेलर यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे ( वय- 84) होते.
दिवंगत मधुकर ढोले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी कडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधुकर ढोले यांचे सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान होते. ढोले परिवाराच्या दुःखात तेजवार्ता परिवार सहभागी आहे.
------%-----


stay connected