कड्यात नदीच्या किनारी जुगार अड्ड्यावर छापा -------------- पोलिसांकडून पाच जणावर कारवाई, 6600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 कड्यात नदीच्या किनारी जुगार अड्ड्यावर छापा
--------------
पोलिसांकडून पाच जणावर कारवाई, 6600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त 



--------------

कडा / वार्ताहर 

---------------

येथील कडी नदीच्या बाजूच्या असलेल्या चिंचेच्या बागेत गुरुवारी दुपारच्या सुमारास पाच इसम पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असताना आढळून आल्याने कडा पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला.



पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कडा येथील पोलिसांना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून कडी नदीच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या बागेत काहीजण पैशावर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय खबर दिली. त्या खबरीवरून सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे पोहे नंदकुमार सव्वाशे, भाऊसाहेब आहेर, चंद्रमणी बनसोडे आदींनी कारवाई करून पाच इसमानवर मुंबई जुगार कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

------%-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.