लोहा तालुक्यातील शिवभोजन केंद्र कागदावरच असल्याचा आरोप..
शिव भोजन कुणासाठी ..?
जनतेचा सवाल...!!
लोहा :-चंद्रकांत वाघमारे
शिवभोजन योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, जी गरीब आणि गरजू वर्गाला स्वस्त दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देते. मात्र, लोहा तालुक्यातील शिवभोजन हे केंद्र कागदावरच असल्याने तालुक्यातील मजुर ,गरीबांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा येथे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात कोणीही उपाशी राहू नये गोरगरीब, गरजूना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने शिव भोजन योजना सुरू केली आहे. पण लोहा तालुक्यातील दोन ही शिव भोजन केंद्र चालकाकडून या उद्देशाला काळीमा फासण्याचे काम होत असल्याचा तालुक्याचे ठिकाण असनारे लोहा येथे नुकताच एक प्रकार उघडकीस आला.
तालुका लोहा येथील तिरुपती शिव भोजन थाळी केंद्राचा भयानक आणि गलिच्छ प्रकार समोर आला आहे. तालुक्यात दोन शिव भोजन थाली केंद्र असून शेकडो थाळीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते, अशातच लोहा तालुक्यातील तिरुपती शिव भोजन येथे एका शिव भोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामध्ये त्रुटी समोर आल्या आहेत. या शिव भोजन थाळी केंद्रावर भांडी चक्क घान पाण्यात. तर दिवसभर चहाचे ग्लास धुतलेल्या पाण्यात भांडी व प्लेट थुतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच धुतलेल्या थाळीत पुन्हा भोजन दिले जात आहे. अशा शिव भोजन चालकाकडून गोर गरिबांची थट्टा मांडली जात असून त्यांच्या जिवाशी खेळले जात आहे. अशे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख जयराम पाटील इंगळे यांनी चिंता व्यक्त केले आहे.
याच बरोबर शिव भोजन केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच बरोबर हात धुण्याची योग्य व्यवस्था व स्वच्छता ठेवणे पिण्याचे पाणी व इतर सर्व सोयीसुविधा चे नियमास केराची टोपली दाखवली जात आहे तालुक्यात एकूण दोन शिव भोजन केंद्रांपैकी एकही केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. या योजनेच्या नावाखाली दोन्ही केंद्रचालक सुविधा न पुरवता शासनाची दिशाभूल करून शासनाचे अनुदान लाटत आहे. अशा या गंभीर विषयाकडे संबंधीत विभागाने तात्काळ लक्ष देऊन तालुकास्थरीय पथक नेमून लोहा तालुक्यातील दोनही शिव भोजन केंद्राची तपासणी करून शासनाने घालून दिलेल्या शिव भोजन केंद्र चालकांसाठी अटी व शर्तिचे पालन न करणाऱ्या केंद्र चालकांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करनार असरल्याचे जयराम पाटील इंगळे यांनी सांगितले आहे
तालुक्यात अनेक गोर गरीब कष्टकरी आणि गरजू लोकांना अल्पदरात शिव भोजन उपलब्ध होत नाही सततचे कार्यकर्ते नातेवाईक,व हाॅटेल वर येनारे ग्राहकांचे फोटो घेऊन थाळीचा लाभ घेतल्याचे दाखवुन गोर गरीब कष्टकरी आणि गरजू व शासनाची दिशाभूल केली जात आहे आसेही जयराम पाटील इंगळे व चाॕदभाई शब्बीर शेख यांनी सांगितले
यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुक्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल असे ही जयराम पाटील इंगळे व चाॕदभाई शब्बीर शेख जिल्हा संघटक प्रहार जनशक्ती पक्षा नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले


stay connected