महापुरुषांचा संघर्ष हा मानवाच्या कल्याणासाठी होता - अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

 महापुरुषांचा संघर्ष हा मानवाच्या कल्याणासाठी होता - अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे 



मुंबई ( आशा रणखांबे प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांचा लढा संघर्ष हा मानवाच्या कल्याणासाठी होता,  समाजातील अनिष्ट प्रथा रुढी यांना छेद देऊन माणसाला जोडण्याचे कार्य करीत राहिले. आज आपण पाहतो की प्रत्येक महापुरुषांना जाती-धर्मा मध्ये वाटून घेतलेले आहे त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. ही शोकांतिका आहे, असे सामाजिक कार्यकर्ते भाष्यकार अ‍ॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी खंत व्यक्त केली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंडळ, मुख्य मल:निस्सारण (बाबुलाल वर्कशॉप) कार्यशाळा बी. विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका डोंगरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात (शिवराय ते भीमराय) याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, आज भारतात कामगारांना रविवारची सुट्टी मिळते त्यासाठी कामगार नेते नारायण मेघाची लोखंडे यांनी कामगारांसाठी मोठा लढा उभा केला होता.

आज आपण डोंगरी परिसरात महापुरुषांची जयंती साजरी करतोय परंतु याच भूमी मध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट पाहतोय त्याचे बांधकाम पूना कमर्शियल कंपनी यांनी केलेले होते तसेच टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, आणि पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनल याचा काही भाग सुद्धा महात्मा जोतिराव फुले यांच्या कंपनी कडून बांधकाम करण्यात आले होते. तसेच याच परिसरात सार्वजनिक "शिवजयंती" सुद्धा महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आले होते. तसेच आरक्षण, जनगणना, उपवर्गीकरण, आणि महिला आरक्षण विधेयक, बोनस आणि अनुकंपा तत्त्वावर याबद्दल सुद्धा अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानिक मध्ये २६ जुलै १९०२ मध्ये ५० टक्के आरक्षण बहुजन वर्गाला लागू केले, त्यामुळे बहुजन समाजाला मोठा आधार मिळाला. कामगारांना त्यांचे हक्क व सवलती भारतीय संविधानात समाविष्ट करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या माणसाला न्याय मिळवून दिलेला आहे.

सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनायक गवस उपमुख्य अभियंता, श्रीमती प्रांजली नेमाडे सहाय्यक अभियंता, नरेश गुरव सहाय्यक अभियंता, सचिन भगत सहाय्यक अभियंता, आकाश परब दुय्यम अभियंता,  कार्यकारी अभियंता सुरेश येमेकर, सदानंद गुप्ता दुय्यम अभियंता, आनंद पाटील, कनिष्ठ अभियंता रोशन ढोणे, तर जयंती मंडळाचे अध्यक्ष दादू पवार, उपाध्यक्ष मंगेश टोम्पे, विवेक पवार सचिव, लक्ष्मण धनावडे खजिनदार, रविंद्र वानखेडे, उपखजिनदार,

दिपक पवार उपसचिव, रुचिता कांबळे महिला उपाध्यक्ष, संतोष जाधव, नारायण पालव, रमेश डवरी, इम्रान शेख, जाॅड॔न लोपिस, दिपक जमदाडे, अवधूत मयेकर, बाळू माने, प्रणित मयेकर, गणेश अंग्रख, सुनील जाधव, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पवार व रवींद्र वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दादू पवार यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.