महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्यास मुदतवाढ
प्रातिनिधिक कवितासंग्रहास उदंड प्रतिसाद
( प्रतिनिधी – मुंबई )
महाड येथील ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ( २०२६ – २०२७ ), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने संपादक नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहास राज्यभरातील कवी - लेखकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता पुन्हा कविता पाठविण्याची शेवटची मुदत दि. 10 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रातिनिधिक कवितासंग्रहात दिग्गज नामवंत मान्यवरांच्या कविता कवितासंग्रहात वाचकांना वाचावयास मिळणार आहेत. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक, माणूस जोडणाऱ्या आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे 9967435032 / 9967480932 या क्रमांकावर संपर्क साधावा.


stay connected