आष्टी शहरात आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा भव्य उत्सव,तयारी अंतिम टप्प्यात भव्य वकृत्व स्पर्धा,प्रतिमा पुजन,भव्य शोभायात्रा,पंजाबी पथक, कोल्हापूर हलगी पथक फुलेप्रेमी, महिला, पुरुष,युवकांनी जास्तीत सहभागी होऊन कार्यक्रमाचे लाभ घ्यावे उत्सव समितीचे आवाहन

 आष्टी शहरात आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा भव्य उत्सव,तयारी अंतिम टप्प्यात

भव्य वकृत्व स्पर्धा,प्रतिमा पुजन,भव्य शोभायात्रा,पंजाबी पथक, कोल्हापूर हलगी पथक 
फुलेप्रेमी, महिला, पुरुष,युवकांनी जास्तीत सहभागी होऊन कार्यक्रमाचे लाभ घ्यावे उत्सव समितीचे आवाहन 




आष्टी प्रतिनिधी 


समाजप्रबोधन, शिक्षण आणि शेतकरीहिताचे महान पुरस्कर्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज ११ एप्रिल रोजी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी भव्य-दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आष्टी शहरात मागिल अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे सामाजिक उपक्रमांचे भान राखून उपक्रम राबविले जात आहेत.महात्मा फुले यांची १९९ वी जयंती दि.११ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.यामध्ये महा रक्तदान शिबीर पाडले पार,प्रतिमा पुजन,भव्य शोभायात्रा, पंजाबी  पथक या विविध कार्यक्रमांचा शहर पंचक्रोशीतील सर्व फुले प्रेमी महिला ,पुरुष, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कमानी थाटल्या आहेत.फुलेंची प्रतिमा असलेले झेंडे चौकात लावण्यात आले आहे.



स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आष्टी शहरात धुमधडाक्यात सालाबादप्रमाणे ११  एप्रिल रोजी शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी देखील जयंती उत्सवानिमित्त दि.९ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर पार पडले रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आले.तर दि.१० रोजी सायंकाळी सायं ५ भव्य वकृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.दि.११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आष्टी शहरातील महात्मा फुले चौक येथे प्रतिमा पूजन होईल व सायंकाळी ४ ते १० पर्यंत भव्य शोभायात्रा होणारा असून प्रमुख आकर्षक बॅन्जो व कोल्हापूर येथील हलगी पथक ,पंजाबचे पथक असणार आहे. वरील सर्व कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा व सर्व फुले प्रेमींनी,महिला, पुरुष,लहान मुले मुली,युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव आष्टी च्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.