आष्टीत सार्वजनिक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर; दीडशे रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग महिलांचा ही सहभाग
आष्टी प्रतिनिधी
सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव आष्टी यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमात तब्बल १४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.या रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. सकाळपासूनच युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व सांगताना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देणारे कार्य आहे, असे मत व्यक्त केले. रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी राखत व तरुणांना रक्तदानाविषयी माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आष्टी शहरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदीरात सार्वजनिक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दि.९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिरास सुरूवात झाली १४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने प्रशस्तीपत्र, गुलाबपुष्प व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.अहिल्यानगर येथील सुरभी रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करत रक्तसंकलनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होऊन युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.रक्तदात्यांना केळी, फ्रुटी देण्यात आली हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.मोठ्या संख्येने नागरिक, तरुण उपस्थित होते.



stay connected