मराठा सेवा संघातर्फे .....शालिनीताई विखे पाटील यांना *समाजभूषण* पुरस्कार
प्राजक्ताताई धस यांना *स्त्री शक्ती प्रेरणा* पुरस्कार
सावळारा जंजिरे काका यांना *जीवन गौरव* पुरस्कार जाहीर
आष्टी प्रतिनिधी -
आंतरराष्ट्रीय पातळीवर समता समानता बंद होता स्वातंत्र्य या मूल्यांचा पुरस्कार करून समाजामध्ये काम करीत असलेल्या मराठा सेवा संघातर्फे राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इंजि. विजय घोगरे यांच्यातर्फे इंजि. तानाजी बापू जंजिरे यांनी आष्टी येथील पत्रकार परिषदेमध्ये हे पुरस्कार जाहीर केले.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शिवमती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक व महिला सक्षमीकरण कार्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना *समाजभूषण पुरस्कार* देण्यात येत आहे तर महानंद डेअरीच्या संचालिका आष्टी येथील शिवमती प्राजक्ताताई सुरेश धस यांनी वेगवेगळ्या माध्यमातून स्त्री सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना *स्त्री शक्ती प्रेरणा पुरस्कार* जाहीर करण्यात आला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन 87 वर्षे वयाचे आष्टीचे सुपुत्र सावळेराम कृष्णाजी जंजिरे काका ,यांनी मुंबई येथे राहून गावाकडील विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल व दीपस्तंभ होऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना *जीवनगौरव पुरस्कार* जाहीर करण्यात आलाआहे.
हे तीनही पुरस्कार आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या वेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येणार आहेत . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे हे राहणार आहेत.
यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, मराठवाडा भूषण आ.सुरेश धस, आ.सतीश भाऊ चव्हाण, इंजि.नवनाथ घाडगे, शिवश्री अर्जुनराव तनपुरे, शिवश्री मनोज दादा आखरे, शिवमती सीमाताई बोके,माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे काका यांचेसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पंचक्रोशीतील प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर ,इंजिनिअर, वकील व समाजाच्या सर्व थरातील कार्यकर्त्यांनी या लोकांपर्यंत लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंजि.तानाजी जंजिरे, भास्करराव निंबाळकर, लक्ष्मण रेडेकर,प्रा. डॉ.बाबासाहेब मुटकुळे ,प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे प्राचार्य शशिकांत कन्हेरे, सुरेश पवार सर, बन्सीधर मोरे , ॲड सीताराम पोकळे आदी मान्यवरांनी केले आहे.


.jpg)

stay connected