दौलावडगाव येथे उर्स निमित्त सर्वरोग निदान मोफत शिबिराचे आयोजन

 दौलावडगाव येथे उर्स निमित्त सर्वरोग निदान मोफत शिबिराचे आयोजन



आष्टी (जि. बीड) : हजरत सय्यद नसरुद्दीन शहा (पीर बाबा) यांच्या यात्रा उत्सवानिमित्त दौलावडगाव येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


हे शिबिर दौलावडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. गुरुवार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.30 ते सायं. 5 वाजेपर्यंत हे शिबिर पिर बाबा दर्गा परिसर, दौलावडगाव येथे होणार आहे.


या शिबिरात डॉ. संतोष गिते (एम.डी. मेडिसिन), डॉ. गणेश गिते (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सौ. विजयश्री गिते (नेत्र तज्ञ), डॉ. संजय अकोलकर, डॉ. फसले चक्रधर, डॉ. समाधान जाधव, डॉ. सौ. निता जाधव, डॉ. समीर सय्यद, डॉ. शुभांगी फसले, डॉ. जुबेर शेख आदी तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.


विशेष म्हणजे, या शिबिरात रुग्णांना मोफत औषधेही दिली जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


दरम्यान, उर्स उत्सवानिमित्त 22 ते 24 एप्रिल दरम्यान भव्य मिरवणुका, आतिषबाजी, तमाशा, कुस्ती स्पर्धा व कव्वाली कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, दौलावडगावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.