विचारांची जयंती साजरी होणे म्हणजेच आंबेडकरी चळवळ होय. - ॲड. पी.सी. सोनावणे

 विचारांची जयंती साजरी होणे म्हणजेच आंबेडकरी चळवळ होय. - ॲड. पी.सी. सोनावणे





( मुंबई / प्रतिनिधी आशा रणखांबे) 

महापुरुषांचे विचार म्हणजेच मानवता धर्म आहे, तो प्रत्येकाला जगण्याचा हक्क देतोय त्यामुळेच भारतीय संविधानात शेवटच्या माणसाचा विचार केलेला दिसून येत आहे अर्थात प्रत्येकाचे संरक्षण करण्याची हमी भारतीय संविधान देत आहे असे प्रतिपादन आंबेडकरी विचारांचे भाष्यकार अधिवक्ता प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी केले.


बहुजन परिवर्तन सामाजिक संस्था (रजि.) घणसोली नवी मुंबई येथे मराठी शाळा पटांगणात महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने जाहीर व्याख्यानाचे कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धनराज धवणे (एम.डी) आणि मोहन म्हात्रे उद्योजक म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ॲड. पी सी सोनावणे होते.

पुढे आपल्या व्याख्यानात ॲड. सोनावणे म्हणाले की सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, महागाई भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अनुसूचीत जाती जमाती वर होते असलेले अन्याय अत्याचार त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता डागाळलेली होत चालली आहे. 

आरक्षण मध्ये उपवर्गिकरण करण्याचा घाट सरकार घालत आहे त्यामुळे महापुरुषांचा विचार संपण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या तरुण वर्गाने आपला वेळ सोशल मीडियावर न देता वाचनाकडे जास्त वेळ देणे अपेक्षित आहे. महापुरुषांचे विचार ओरिजनल वाचून ते लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य करणे अपेक्षित आहे. तसेच AI मुळे महापुरुषांचे ओरिजनल फोटो विद्रूप करण्याचा घाट चालू आहे तो हाणून पाडला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाचे वाचन होऊन त्यातील प्रत्येक अनुच्छेदाचे महत्त्व समजले पाहिजे. जयंतीचे इव्हेंट होऊन न देता याचे गांभीर्य ओळखले पाहिजे आणि पुढे खऱ्या अर्थाने विचारांची जयंती साजरी करण्यासाठी आजचा तरुण कटिबध्द होईल.

कार्यक्रमाची प्रास्ताविक नामदेव जगताप यांनी केले सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष नामदेव जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष गौतम गमरे यांनी केले तसेच सचिव नरेश पवार, उपसचिव अमन जाधव, खजिनदार सागर कांबळे, अमोल मंडाळे, अनिल जाधव, शिवाजी कांबळे, महिला मंडळ नमिता पवार, सायली जाधव, प्रतिभा सोनावणे, प्रिया सकपाळ, मनाली आगाशे, मीना कांबळे, सुषमा तांबे, सांची जाधव, सविता मोरे, कल्याणी गमरे, प्रवीण जाधव, प्रमोद जाधव, गणेश गमरे, नरेंद्र तांबे, आदींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.