धानोरा येथे तीन शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

धानोरा येथे तीन शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न



आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य श्री. शिवाजी मारुती ढोबळे, प्राध्यापिका श्रीमती सुनिता नामदेव बांदल आणि प्राध्यापक श्री. अजित आण्णासाहेब इथापे यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार बांदल आण्णा उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे, जयदत्त धस, मनोरंजन धस, अंकुश चव्हाण, परमेश्वर काका शेळके, राजू दहातोंडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

जनता वसतिगृह शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या या विद्यालयात या तिन्ही शिक्षकांनी अनेक वर्षे निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होऊन समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे .

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते या तिन्ही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी: हमजान शेख
सह: अशोक अडागळे, धानोरा (ता. आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.