शंभर टक्के लोकवर्गणीतून उभारलेल्या...राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृहाचा आज आष्टीत लोकार्पण सोहळा

 शंभर टक्के लोकवर्गणीतून उभारलेल्या...राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृहाचा आज आष्टीत लोकार्पण सोहळा






  तेजवार्ता / आष्टी -

       मराठा सेवा संघाच्या वतीने आष्टी येथे एक विद्यार्थी वस्तीगृह उभारण्यात आले आहे. हे वस्तीगृह शंभर टक्के लोक वर्गणी जमा करून उभारलेले आहे. या *राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृहाचा* लोकार्पण सोहळा आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आष्टी येथे होत आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष आदरणीय इंजि. पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या सुविध्य पत्नी माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. 

       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा भूषण आमदार इंजि.सुरेश (आण्णा) धस, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आणि मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इंजि. विजयकुमार घोगरे हे भूषविणार आहेत.

       यावेळी इंजि. नवनाथ घाडगे प्रदेश कार्याध्यक्ष ,ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज दादा आखरे ,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके , शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर नाना, माजी आ. बाळासाहेब आजबे काका यांचे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

       बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उभारलेल्या या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंजि. तानाजी जंजिरे ,भास्करराव निंबाळकर लक्ष्मण रेडेकर, प्रा. डॉ.बाबासाहेब मुटकुळे, प्रा. डॉ.दत्तात्रय नरसाळे, सुरेश पवार, प्राचार्य शशिकांत कन्हेरे,  बन्सीधर मोरे, ॲड .सीताराम पोकळे पत्रकार ,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शिवमती आशाताई करांडे, प्रा. ज्ञानेश्वर नवले, महेश शिंदे सर, सुवर्णाताई गिरे, विद्याताई चव्हाण, वर्षाताई शिंदे ,ॲड निर्मलाताई सोनवणे यांचे सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वधू वर कक्ष ,मुस्लिम ब्रिगेड, शिक्षक परिषद, कृषी परिषद, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व इतर कक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.