धानोरा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ वाघुले
____________
धानोरा महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
समाजाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची गरज - प्राचार्य वाघुले
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाघुले हे तर उपप्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी प्राचार्य डॉ वाघुले यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजसुधारक कार्याचा गौरव करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आज समाजाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची गरज असल्याचे सांगत, तरुणांनी त्यांचे विचार अंगिकारून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करावा. आज विज्ञान युगात ही आपल्या देशात काही ठिकाणी अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धाचे प्रकार पहावयास मिळत आहे. महात्मा फुले यांनी त्यांच्या काळात शिक्षणाचे महत्व सांगत अंधश्रध्दा दूर करून समाजाचा विकास केला. तरुणांनी ही त्यांचे विचार आत्मसात करून समाजाचा विकास करावा असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य एकशिंगे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा निसार शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा राजू शेलार यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा विवेक महाजन, प्रा अजिनाथ गिलचे, प्रा गोरक्षनाथ वाळके, प्रा राजेंद्र मिसाळ, प्रा ज्ञानदेव बोडखे, प्रा श्रीमती रत्नमाला तरटे, प्रा श्रीमती शबाना शेख, प्रा अतेश बनसोडे, प्रा सतीश तागड, प्रा नितीन बालशंकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected