कड्यात भीमजयंती उत्सवाची जल्लोषात तयारी
------------------
भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम व समाजप्रबोधनाचा संगम
-----------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
कडा शहरात भीम जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथे मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक, रॅली, भोजनदान सोहळा होणार असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.
या उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, गौतम बुद्ध यांची मूर्ती, तसेच संविधान व रमाई-बाबासाहेब यांच्या देखाव्यांचे आकर्षण राहणार आहे. अनिकेत अविनाश गायकवाड यांचे नृत्य सादरीकरण, महाराष्ट्राचा युवा गायक संतोष जोंधळे यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जितेंद्र दादा आसोले यांचे प्रेरणादायी व्याख्यान यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढणार असून, रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. कडा शहरातील हा उत्सव एकोपा, प्रेरणा व सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ठरत आहे.
------%----


stay connected