अल्ताफ शेख यांच्या आगामी चित्रपटात आशिकी फेम राहुल रॉय झळकणार

 अल्ताफ शेख यांच्या आगामी चित्रपटात आशिकी फेम राहुल रॉय झळकणार



(प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र  गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणेला आपली कर्मभूमी बनविलेले हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध चित्रपट लेखक, दिग्दर्शक, गीतकार, आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले   वेडा बीएफ, कर्मयोगी आबासाहेब ,धारावी कट्टा, कमॉन विष्णू असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेले लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख  आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रचंड गाजलेल्या आशिकी या चित्रपटाचे मुख्य नायक असलेले अभिनेते राहुल रॉय यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत आगामी चित्रपट करण्याबद्दल बोलणे केले. यावर राहुल रॉय यांनी होकार दिला.



राहुल रॉय यांनी अल्ताफ शेख यांना अत्यंत आपुलकीने भेट देऊन बऱ्याच विषयांवर चर्चाही केली. या भेटीदरम्यान त्यांचा शांत आणि सरळ स्वभाव वाखाण्याजोगा होता. गप्पांच्या ओघात रॉय यांनी चित्रपट सृष्टीतील अनेक बारीक दुवे ही सांगितले. शिवाय अल्ताफ शेख यांनी आतापर्यंत हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेते म्हणून केलेले कार्य चांगले असल्याचे म्हटले. आगामी हिंदी चित्रपटात ही जोडी सोबत काम करणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.