शिक्षक शिवहर आकुसकर ३० एप्रिलला सेवानिवृत ,,,
प्रतिनीधी जीवन जाधव ,,
आदर्श शिक्षक श्री शिवहर गुंडप्पा आकुसकर हे आता सेवानिवृत्त होत आहेत.एक आदर्श शिक्षक म्हणून ख्याती प्राप्त असणारे श्री आकुसकरसर हे एक हरहुन्नरी शिक्षक, समाजसेवक व भारतीय संस्कृती अभ्यासक म्हणून लातूर,बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सुपरिचित आहेत.मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आकुसकरसर यांची जन्म तारीख पंधरा एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ही आहे. त्यांना बालपणापासूनच अभ्यासासह कला,क्रिडा,नाट्यकला व समाजसेवा या विषयाची आवड होती.त्यांनी अडोतीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सेवेस सुरुवात केली.पुढे सेवा करीत करीत त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता वाढवली.त्यानंतर
M.A.B.Ed.ही पदव्युत्तर पदवी व शिक्षण पदवी प्राप्त केली आहे.श्री शिवहर आकुसकर यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव काम करीत आयुष्यभर गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले आहे.जिथे स्थलांतर होईल त्या गावातील विद्यार्थी व गावकरी यासाठी त्यांनी चंदनासम झिजून आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध मिळवून दिला आहे.म्हणुन त्यांचे शेकडो विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर,आदर्श शेतकरी व आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.त्यांचं मूळ गावं बीड जिल्ह्यातील आडस (तालुका केज मधील) हे आहे.परंतु त्यांनी सेवा केलेल्या प्रत्येक गावातील गावकरी हे आकुसकरसर आमच्याच गावचे आहेत. असे अभिमानाने सांगतात .
तरीही त्यांनी सेवा केलेल्या शाळा पाहता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
चिखली केंद्र आमला तालुका माजलगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
केद्र मोहा तालुका माजलगाव ,
जिल्हा परिषद प्रशाला खरोळा तालुका रेणापुर जिल्हा लातूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
दत्तनगर, केंद्र शाळा मुरुड तालुका लातूर, जिल्हा परिषद केंद्रिय शाळा पानगाव तालुका रेणापूर, आणि आता सेवापुर्ती होते आहे ती शाळा व गाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर तांडा केंद्र दर्जीबोरगावं,ता.रेणापुर हे आहे.
अशा प्रकारे तीन सप्टेंबर एकोणीसशे आठ्याऐंशी पासून ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत अशी अडोतीस वर्षे उत्कृष्ट शिक्षण सेवा करून त्यांची आता शासकीय सेवा पुर्ती होत आहे.श्री आकुसकरसर यांना
सामाजिक कार्यात व राष्ट्रीय कार्यात रस आहे.तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र नवी दिल्लीचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे.संपुर्ण लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व संस्थांच्या अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना उदयपूर(राजस्थान),गोहाटी (आसाम), हैदराबाद,नवी दिल्ली व देशातील अनेक प्रसिद्ध ठिकाणी शासनाच्या खर्चाने प्रशिक्षण व भारतीय संस्कृती अभ्यास संधी दिली आहे.शाळांनाही हजारो रुपयांची शैक्षणिक साधने मोफत मिळवून दिली आहेत.
अगदी सेवापुर्ती वर्षातही लातूर शहरातील नाट्य रसिकांसह महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग मिळवत,कुमार संगीत दहन,
रातामतारा,नटसम्राट इत्यादी नाटकात भूमिका केल्या आहेत.विशेष म्हणजे अनेक नामांकित नाटकात त्यांनी अल्पशीका होईना भुमिका घेऊन नटराज सेवा चालू ठेवली आहे.सेवाकाळात त्यांना तालुका आदर्श शिक्षक, जिल्हा आदर्श शिक्षक व विविध संस्था आणि संघटनांचे मानाचे सन्मान व अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या सुविज्ञ पत्नी एक आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.मुले विविध उच्च पदावरील नौकरीत असुन जावई हे ही नौकरीत आहेत.
आयुष्यभर जनसेवा करणाऱ्या व आता वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्विकारणा-या श्री शिवहर गुंडप्पा आकुसकर यांना विविध शिक्षक संघटना, विविध मान्यवर मंडळी यांनी आरोग्य,संपदा व सामाजिक कामासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांना या दैनिकाच्या माध्यमातूनही खूप खूप शुभेच्छा


stay connected