*आम आदमी पार्टी बीडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी*
______________________________
बीड (प्रतिनिधी) – आम आदमी पार्टी, बीड यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास घोषणा देऊन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण आणि शहराध्यक्ष सय्यद सादेक यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त केली.
भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, लेखक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. “सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत महात्मा फुले यांचे कार्य स्मरणात राहील,” असा भावनिक विचार यावेळी मांडण्यात आला.
या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सामाजिक कार्यकर्त्या किसकींदाताई पांचाळ (संस्थापक अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था), शहर सचिव मिलिंद पाळणे, बीड उपतालुकाध्यक्ष अजम खान, सीता ताई भोसले, छायाताई गोरे, रुक्मिणी ताई नागापुरे, एकल महिला संघटना, शिवकन्या ताई कागदे ,अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





stay connected