महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी प्रा. केशव शिंदे यांची बिनविरोध निवड

 महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी प्रा. केशव शिंदे यांची बिनविरोध निवड



आष्टी, दि. २४ (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवड माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.

या निवड प्रक्रियेत श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. केशव शिंदे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. काळे सर, उपप्राचार्य श्री. धोंडे सर तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. शिंदे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.