ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराचा लाभ घेण्याबाबत ग्रामीण भागामध्ये जागृती करावी.. --- आ.सुरेश धस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सारखे दुर्धर आजारावरील अत्याधुनिक उपचार तसेच अनेक आजारांवर उपचार सुरू करण्यात आले असून शहरी भागातील खर्चिक उपचारांपेक्षा आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये विनामूल्य असलेल्या या उपचाराचा फायदा गोरगरीब रुग्णांनी घ्यावा याबाबत ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी आणि आरोग्य सेवेचा सर्वात मोठा खर्च वाचवावा असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सोनोग्राफी मशीन चा शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोळंके आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे रुग्णकल्याण समिती अशासकीय सदस्य प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, सनियंत्रण समिती सदस्य जालिंदर पोकळे, पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग आष्टी विधानसभा मतदारसंघ प्रमुख गणेश नाना शिंदे, माजी सभापती आदिनाथ सानप, पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे उपस्थित होते..
पुढे बोलताना आ. सुरेश धस म्हणाले की पूर्वी आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये दैनंदिन रुग्ण तपासणी ओपीडी अत्यंत कमी होती रुग्ण आल्यास त्याच्यावर थातूरमातूर उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे पाठवण्यात येत होते आता यापुढे असले गैरप्रकार होणार नाहीत त्यामुळेच डॉ.रामदास मोराळे यांच्यासारख्या अत्यंत कार्यक्षम आणि सेवाभावी वृत्ती असल्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सोपवला असून रुग्णकल्याण समितीचे सदस्यांनी देखील अत्यंत चांगले काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगत यापुढे
अत्यंत खर्चिक आणि अहिल्या नगरला जाऊन करावे लागत असलेली डायलिसिस सेवा ठिकाणी सुरू करून रुग्णांचा मनस्ताप आणि खर्च वाचणार आहे असे सांगून आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये आता दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढणे, सिजेरियन प्रसूती, अपेंडिक्स,हर्णिया आणि मुळव्याध या शस्त्रक्रिया, महिलांसाठी आठवड्यातून एकदा सोनोग्राफी, 12 आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात सेवा, या सर्व सेवा तेही विनामूल्य पद्धतीने होणार असल्यामुळे गोरगरीब जनतेने याचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपचारांविषयी फलक लावावेत असे आवाहन करून ते म्हणाले की, सध्याची दैनंदिन रुग्ण तपासणी सरासरी 250 वरून 500 पर्यंत व्हावी अशी आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी आपण सतत प्रयत्नशील असून शासन पातळीवर आपण यासाठी पाठवा करत राहू असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके म्हणाले की, आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने डॉ. रामदास मोराळे आणि त्यांचे टीम काम करत असून या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे कर्मचारी आणि सर्व अडीअडचणी ची पूर्तता करण्यात येईल..
आ.सुरेश धस यांचे मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयांकडे चांगले लक्ष असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळत आहेत असे सांगितले यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे म्हणाले की, अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण या ग्रामीण रुग्णालयाचा पदभार घेतला असून दैनंदिन ओपीडी मध्ये वाढ झाली असून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन यापुढे सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार करून गोरगरीब रुग्णांची सेवा या रुग्णालयाद्वारे करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आ.सुरेश धस अण्णा यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी वीज आणि पाणी या सुविधा उपलब्ध झाल्या असून यापुढे आणखी चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे सांगितले
रुग्ण कल्याण समितीचे अशासकीय सदस्य यावेळी म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेचे आरोग्य मंदिर असून या ठिकाणी आता अत्यंत चांगले पद्धतीची सेवा सुरू झाली आहे आ.सुरेश धस यांच्या पुढील संकल्पनेतून त्यांनी येथील सर्व व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला असून रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले..
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी प्राध्यापक सय्यद अलाउद्दीन यांनी केले यावेळी.... यांच्यासह ग्रामीण रुग्णालय सहाय्यक अधीक्षक श्री शंकर सोंडगे कनिष्ठ सहाय्यक योगेश सोनवणे परिसेविका श्रीमती बेबी शेख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गुट्टे डॉक्टर सुरेश ढाकणे डॉक्टर चारुदत्त पवार डॉक्टर नितीन घोडके डॉक्टर भूपेंद्र पन्हाळे डॉक्टर संतोष जावळे डॉक्टर निखिल गायकवाड उपस्थित होते.





stay connected