*डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शांतता आणि समानतेचे मूल्य शिकवले - राजाराम गुजर*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शांतता आणि समानतेचे मूल्य शिकवले असे मत वक्ते राजाराम गुजर सर यांनी वेळापूर मुली शाळेत आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ मनीषा भानवसे होत्या. प्रमुख पाहुणे औदुंबर माने व पत्रकार बाळासाहेब बनसोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी केले
यावेळी बोलताना राजाराम गुजर म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्याय समानता आणि वंचिताच्या उत्थानासाठी समर्पित केले. शिक्षण आणि उपेक्षित वर्गाच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. जातीय भेदभाव विरुद्ध लढा दिला. आणि दलितांचे हक्कांसाठी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य विशिष्ट जाती धर्मात अडकून न राहता त्याने देशाला संविधान दिले. मजबूत लोकशाही दिली. म्हणूनच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जगाच्या इतिहासात पाहायला मिळेल.
यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण घाडगे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमासाठी श्रीमती आसराबाई जैन, श्री पांडुरंग कुलकर्णी,कविता आवटे, मॅडम शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.



stay connected