डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पत्रकार संतोष ससाणे पत्नी शितल ससाणे या दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प!

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पत्रकार संतोष ससाणे पत्नी शितल ससाणे या दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प!



  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिगामी परिस्थिती असताना या देशातील शोषित, पीडित,शूद्र अति शूद्र व महिलांसाठी जे कार्य केले ते अतुलनीय आहे.पशुवत जीवन असलेल्या शूद्र अति शूद्रांचा स्वाभिमान जागा केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये खूप त्याग, कष्ट, हाल, अपेष्टा सहन करत वेळप्रसंगी आपल्या कुटुंबाची ही परवा न करता आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालून बहुजन उद्धाराचे कार्य केले,त्यांनी आपल्या असामान्य ज्ञानाच्या जोरावर जगातील सर्वोत्कृष्ट संविधानिक लोकशाही व्यवस्था निर्माण करून देशवासीयांना स्वाभिमानाने,सन्मानाने, जीवन जगता यावे यासाठी सर्वांना समान हक्क अधिकार दिले आणि करोडो बहुजनांचा उद्धार केला.कितीही जन्म घेतले त्यांच्या उपकाराची परतफेड करणे अशक्य आहे,परंतु त्यांनी आपल्या अनुयायाकडून एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती की,मी महत प्रयासाने समाज विकासाचा गाडा इथपर्यंत आणला आहे तो पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा परंतु तो मागे हटता कामा नये,त्यांनी समाजाच्या विकासासाठी याच भारत भूमीतील सर्वोत्तम भूमिपुत्र भगवान गौतम बुद्धांच्या धम्म दिला, त्याचे अनुकरण व त्याचा प्रचार प्रसार करण्याचे तरुणांना सांगितले,त्यांच्या विचारावर चालत असताना, सामाजिक धार्मिक कार्य करत असताना, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आयुष्यभर त्यांच्या विचाराचं त्यांनी दिलेल्या विज्ञानवादी बौद्ध धम्माच कार्य करत राहण्याचा वसा घेतलेले आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणजे संतोष ससाणे आणि त्यांच्या पत्नी शितल ससाणे. या ससाणे दांपत्यांनी या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या निमित्ताने मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी अनोखे अभिवादन केले आहे,आयुष्य संपल्यानंतर या देहाची राख रांगोळी, माती होण्यापेक्षा, तो आपला देह वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांना प्रयोगासाठी उपयोगी ठरावा, त्यातून त्यांना अजून मानवी जीवनासाठी सखोल अभ्यास करता यावा यानिमित्ताने आपला देह मरणोत्तरही समाजासाठी कामी यावा, या सामाजिक आणि बुद्ध धम्माच्या दान पारमितीच्या पालन या भावनेतून त्यांनी मरणोत्तर आपला देह स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्व ईच्छेने अर्ज करत,घोषणापत्र देत देहदान करण्याचा संकल्प केल्याचे पत्र  वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय आष्टी यांच्याकडे सुपूर्त केला, त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,यावेळी आरोग्य अधिकारी रामदास मोराळे, आष्टी भीमजयंती अध्यक्ष सुनील शिंदे सर, जेस्ट पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, रिपाई नेते अरुण निकाळजे, बोद्ध महासभा तालूका अध्यक्ष रत्नकांत निकाळजे,सरचिटणीस आकाश कांबळे, आष्टी शहर अध्यक्ष किशोर निकाळजे, विजय काळे सुनील साळवे, रिपाई युवा कुणाल निकाळजे, समता सैनिक काळे आदि उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.