आमदार सुरेश धस यांनी मागणी करताच सीना प्रकल्पातून पाणी सोडले , ग्रामस्थांकडून आभार व्यक्त
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे मागणी करताच यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आष्टी मतदारसंघात आमदार सुरेश धस यांनी कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २, श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे आष्टी तालुक्यातील सीना प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील पिंपरी (घुमरी), कानडी बुद्रुक आणि वाकी या तीन बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवून शेती सिंचनासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली.
प्रत्यक्ष उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील पिकांना मोठा आधार मिळणार असून, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी आमदार सुरेश झ यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे आमची मोठी चिंता दूर झाली,” अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.
याबाबत आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. भविष्यातही त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.”
दरम्यान, प्रशासनाकडूनही या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व नियोजनबद्ध ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.



stay connected