🚨 १० वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद; अहिल्यानगर हादरलं!

 🚨 १० वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद; अहिल्यानगर हादरलं!




प्रतिनिधी | तेजवार्ता न्यूज नेटवर्क


अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून ओळखले जाणारे बाबुशेठ टायरवाले उर्फ बाबू सुब्रमण्यम कांबळत यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १० वर्षे फरार असलेला हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ साली दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात (कलम ३०७ – खुनाचा प्रयत्न) कांबळत यांचे नाव समोर आले होते. मात्र, त्यानंतर ते दीर्घकाळ फरार होते. एवढ्या मोठ्या कालावधीत आरोपी मोकाट फिरत होता, ही बाब संशयास्पद मानली जात असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून अखेर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला आष्टी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत . इतक्या वर्षांपासून आरोपी नेमका कुठे लपून बसला होता?  त्याला कोणाचा राजकीय किंवा इतर पाठिंबा होता का?

पोलिस यंत्रणेपासून तो खरोखरच लपला होता, की त्याला जाणीवपूर्वक संरक्षण मिळत होते?

या प्रकरणामुळे केवळ एक आरोपी अटकेत आला नसून, संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे—

“या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार?”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.