पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आष्टीत भव्य मेळावा; कडा-आष्टी मंडळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
आष्टी (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत आष्टी तालुक्यात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रशिक्षण शिबिर व नियुक्ती सोहळ्याचे प्रभावी आयोजन करण्यात आले. संघटन बळकटी आणि कार्यकर्त्यांना दिशा देणाऱ्या या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात कडा व आष्टी मंडळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी, भाजप नेते देविदास नागरगोजे आणि चंद्रकांत फड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले.
कडा मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी:
उपाध्यक्ष – सुखदेव दगडू खाकाळ, उध्दव सदाशिव गर्जे, जयसिंग ईश्वर गव्हाणे, रेश्मा आजिनाथ शेळके, सविता रघुनाथ घुले, विकास रतन क्षिरसागर
सरचिटणीस – रमेश दिनकर तांदळे, राजेंद्र निवृत्ती गावडे चिटणीस – प्रतिभा मल्हारी शिंदे, दत्तात्रय गणपत वाडेकर, तेजस्वीनी सचिन दळवी, प्रतिभा बाळासाहेब थोरवे, सुनिता हनुमंत अडागळे, गणपत निवृत्ती अस्वर
कोषाध्यक्ष – निळकंठ गोपाळराव रक्टाटे
आष्टी मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी:
उपाध्यक्ष – अॅड. बाळासाहेब महादेव झांबरे, सुंदरलाल बाबुराव गर्जे, सुरेखा गोवर्धन तळेकर, बबनराव रामराव करांडे, पोपट भाऊसाहेब धुमाळ, भगवान पाटीबुवा सांगळे सरचिटणीस – सिंधु लालासाहेब शिंदे, शालन अशोक मुळे
चिटणीस – गुलाब उमर ‘सय्यद पटेल, छाया संजय पवार, रुपाली बाळासाहेब पवार, माणीक नागनाथ दहिफळे, सादीक अब्दुलगणी कुरेशी, निळकंठ निवृत्ती खेडकर कोषाध्यक्ष – विष्णु मच्छिद्र खाडे
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार सुरेश धस यांनी अभिनंदन करत, “पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे,” असे आवाहन केले.
याचबरोबर, या प्रशिक्षण शिबिराचा समारोपही उत्साहात पार पडला. शिबिराद्वारे कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, पक्षाची विचारधारा, प्रभावी संवादकौशल्य आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. यामुळे आगामी काळात पक्षाच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समारोप प्रसंगी भाजप प्रवक्ते व नगरसेवक मा. नवनाथजी बन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. त्यांनी कार्यकर्त्यांनी समाजात सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन केले.या भव्य आयोजनातून आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा संघटना अधिक मजबूत होत असून, तळागाळात पक्षाचा विस्तार वेगाने होत असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रशिक्षण अभियानात भाजपा सोशल मीडिया सेल प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी गाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताजी महाजन, हिंदुत्ववादी कार्यकर्ते व इतिहास अभ्यासक पवन मोगरेकर, विधानसभा प्रमुख गणेश शिंदे, माऊली जरांगे, कडा मंडळ अध्यक्ष अनिल ढोबळे, आष्टी मंडळ अध्यक्ष रमेश गावडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpg)
stay connected