*गांधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल खिलारे याची पीएसआय पदी निवड*
कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल महादेव खिलारे याने महाराष्ट्र शासनाच्या 2024 मध्ये झालेल्या एम.पी.एस.सी. अंतर्गत पीएसआय पदी निवड झाली. मोठी स्वप्ने, कठीण संघर्ष परंतु अढळ जिद्दीच्या सहाय्याने अमोलने आव्हानांवर मात करत हे यश संपादन केले आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी सारख्या ग्रामीण भागात अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये राहून त्याने कठीण परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले यश हे आजच्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे आहे. अमोलने हे यश कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय स्वतः ग्रंथालयात तासनतास अभ्यास करून मिळवले आहे. गांधी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा फायदा झाल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याच्या या यशाबद्दल श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी व गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर भंडारी यांच्या हस्ते अमोलचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



stay connected