*डॉ.विठ्ठल जायभाये यांच्या "तुकाराम नीती"ला राज्यस्तरीय पुरस्कार!* *२४ मार्चला पाडळी, बीड येथे होणार सन्मान!*

 *डॉ.विठ्ठल जायभाये यांच्या "तुकाराम नीती"ला राज्यस्तरीय पुरस्कार!*
*२४ मार्चला पाडळी, बीड येथे होणार सन्मान!*



सोनपेठ: एकता फाउंडेशन महाराष्ट्रचे ई.स.२०२५-२०२६ वर्षातील साहित्य क्षेत्रातील पुरस्कार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, म.सा.प.चे सदस्य, जेष्ठ कवी आणि समीक्षक श्री अनंत कराड (शिरूर कासार) यांनी घोषित केले आहेत. यात कथा, कादंबरी, कविता, संकीर्ण अशा विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात कै.लताबाई पुरुषोत्तम बारडकर राज्यस्तरीय संकीर्ण साहित्य पुरस्कार नव्या पिढीतील संत साहित्याचे साक्षेपी अभ्यासक, व्याख्याते, कवी, कीर्तनकार प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये यांच्या जगद्गुरू संत तुकोबांचे अभंग विवेचन "तुकाराम नीती" ग्रंथाला जाहीर झाला असून दिनांक २४ मार्च रोजी पाडळी ता. शिरूर (कासार) जि.बीड येथे एकता फाउंडेशन आयोजित ८ व्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ.जायभाये यांचा सन्मान होणार आहे. "तुकाराम नीती" हा ग्रंथ डॉ.जायभाये यांनी संपादक डॉ.प्रभु गोरे यांच्या लोकप्रिय दै.आधुनिक केसरी वर्तमानपत्रात सलग वर्षभर केलेले स्तंभलेखन असून छ.संभाजीनगर येथील श्री वैजनाथ वाघमारे यांच्या शब्दवेध बुक हाऊसने प्रकाशित केला आहे. आत्तापर्यंत या ग्रंथाच्या अनुषंगाने जेष्ठ कवी, लेखक प्रा.इंद्रजित भालेराव, तुकोबांचे वंशज गुरुवर्य जेष्ठ समीक्षक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे श्री सचिन पाटील, पोलीस अधीक्षक श्री दिगंबर कदम, कथाकार डॉ.भास्कर बडे, समीक्षक श्री किशन उगले, प्रा.डॉ.ज्ञानदेव राऊत आदी मान्यवरांनी आपले अभिप्राय नोंदवले असून समकालीन परिस्थितीत तुकोबा सर्वांचे पथदर्शी आहेत याचे प्रतिपादन ग्रंथात झाले आहे. या पुरस्काराबद्दल ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष तथा सोनपेठ नगरीचे नगराध्यक्ष श्री परमेश्वर कदम, कोषाध्यक्ष श्री रामेश्वर कदम, कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, सर्व सहकारी आदिंसह साहित्य क्षेत्रातूनही डॉ.जायभाये यांचे अभिनंदन होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.