भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त कड्यात विविध कार्यक्रम ----------------- भक्ती संध्या, शोभायात्रा ते रक्ततपासणी शिबिरापर्यंत उपक्रमांची रेलचेल

 भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त कड्यात विविध कार्यक्रम
-----------------
भक्ती संध्या, शोभायात्रा ते रक्ततपासणी शिबिरापर्यंत उपक्रमांची रेलचेल



------------------

राजेंद्र जैन / कडा 

---------------

येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



सोमवार (दि. ३० मार्च) रोजी प्रख्यात संगीतकार दर्शितजी गादिया यांच्या भक्ती संध्याने महोत्सवाची सुरुवात झाली. मंगळवार (दि. ३१ मार्च) रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान जैन स्थानकातून शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर ९ ते ११ या वेळेत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता राजीबाई स्थानक येथे गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ७ वाजता श्रीराम मंदिर येथे प्रा. गणेश ज्ञानदेव लोळगे (कोल्हापूर) यांचे “आयुष्याला द्यावे उत्तर” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

याशिवाय ४ एप्रिल रोजी मोफत सर्व प्रकारच्या रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकल जैन समाजाने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-------%-------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.