कडा येथे धक्कादायक घटना; मुलाने केला वडिलांचा खून, आरोपी फरार
कडा (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने गाढ झोपलेल्या स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने कडा परिसर हादरला आहे .
उघडकीस आलेल्या पित्याच्या खून प्रकरणाचा आष्टी पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला आहे. आईला होणारी मारहाण आणि रोजच्या कौटुंबिक वादाला कंटाळून १९ वर्षीय मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी करण अनिल मुळे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथून ताब्यात घेतले असून, आष्टी पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळचे पिसादेवी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेले हे कुटुंब कडा येथे भंगार गोळा करून उदरनि करत होते.
या घटनेत अनिल सजना मुळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला असून किरण मुळे (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी गावचे रहिवासी असलेले हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून कडा बसस्थानक परिसरात मजुरीसाठी झोपड्या टाकून वास्तव्यास होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास किरण मुळेकर हा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी अनिल मुळे हे गाढ झोपेत असताना, संतापाच्या भरात किरणने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हल्ला केला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला.
खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्यात आली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेमुळे कडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


stay connected