राज्यस्तरीय कथाकार कै. शंकर पाटील साहित्य पुरस्कार'.. कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना जाहीर

 *राज्यस्तरीय कथाकार कै. शंकर पाटील साहित्य पुरस्कार'.. कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना जाहीर*



अहिल्यानगर:- कोल्हापूर कवी सरकार स्वाभिमानी वाचनालयाच्या वतीने जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारात अहिल्यानगर येथील कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना राज्यस्तरीय कथाकार  कै. शंकर पाटील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने सातारा येथे भरलेल्या २७ व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात, संमेलनाध्यक्ष मा राजेंद्र फंड, प्रसिद्ध कादंबरीकार श्रीकांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजी शिंदे, ज्येष्ठ कवी श्री विलास पाटील, ज्येष्ठ समाजसेविका सौ. सुमन देसाई मुंबई यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागातील सर्व  साहित्यिक,कवी हजर होते.

  सदर साहित्य संमेलनमध्ये श्री बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम देखील सादर झाला.

बाळासाहेब देशमुख यांनी साहित्य क्षेत्रात प्रासंगिका, वात्रटिका ,ललित लेखन , कथालेखन असा साहित्य क्षेत्रात विपूल लेखन केलेले आहे. 

त्यांचा 'रंग माझा वेगळा' हा कथासंग्रह ,अखिल भारतीय साहित्य महामंडळ अध्यक्ष मा मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेला आहे . त्यांचा दुसरा कथासंग्रह 'माणसं अशी.. अन् तशीही..' परमहंस प्रकाशन अमरावती या प्रकाशन संस्थे द्वारे झाला आहे. या कथासंग्रहास इतिहास अभ्यासक मा नवनाथ वाव्हळ, व ज्येष्ठ कादंबरीकार श्रीकांत पाटील कोल्हापूर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या पुरस्काराबद्दल बाळासाहेब देशमुख यांचे साहित्यिक वर्तुळातून अभिनंदन होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.