उच्च शिक्षित मातंग कुटुंबियांचा बौद्ध पद्धतीने बीडच्या आष्टीत शेकडोच्या उपस्थितीत आदर्श विवाह संपन्न!

 उच्च शिक्षित मातंग कुटुंबियांचा बौद्ध पद्धतीने बीडच्या आष्टीत शेकडोच्या उपस्थितीत आदर्श विवाह संपन्न!




आष्टी (प्रतिनिधी )आष्टी येथे पवार आणि साठे परिवारातील वधू-वरांचा विवाह सोहळा बौद्ध धम्म विधीनुसार अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. बीड जिल्ह्यातील ता.पाटोदा येथील शिवाजी साठे यांच्या कुटुंबातील द्वारिका शुंभागी यांचा विवाह मौजे भाळवणी (ता. आष्टी) येथील

श्रीरंग पवार यांच्या कुटुंबातील द्वारक विशाल या उच्च शिक्षित वधुवरांचा सर्व बहुजन समाजाने आदर्श घ्यावा असा भगवान बुद्ध,शिव, फुले, शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करुन ,सर्वप्रथम उपस्थित सर्व शेकडो बंधु,भगिनी,वंदनीय भन्ते, बौद्धाचार्य यांनी सामूहिक संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करुन,बालकांनी महापुरुषाचीसुंदर वेशभूषा परिधान करत व तसेच ५०० प्रति डॉ.बाबासाहेबांचे जातीव्यवस्थेचे निर्मूलन वे पुस्तक आणि काही संविधानाच्या प्रतीचे आलेल्या पाहुण्यांना वाटप करुन बौद्ध पद्धतीने हा शाही आदर्श मंगल परिणय(विवाह)संपन्न झाला या फडणवीस सोहळ्याला चैत्यभूमी, मुंबई येथील भदंत सुमेध बोधी ए. तसेच त्यांचे शिष्य अमरावती येथील भंते आनंद यांनी पारंपरिक बौद्ध धम्म विधीनुसार विवाह संपन्न करून घेतला. बुद्ध व धम्माच्या साक्षीने, पंचशील व त्रिशरण ग्रहण करत समता, करुणा व मानवतेच्या मूल्यांवर आधारित हा मंगल परिणय साजरा करण्यात आला.या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक डी. एस. नरसिंगे, धम्म चळवळीतील कार्यकर्ते प्रबुद्ध साठे, समता सैनिक दलाचे राज्य सचिव अमरसिंह ढाका, लक्ष्मीकांत शिंदे, बीड जिल्हा (प) अध्यक्ष महालिंग निकाळजे, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ जगझाप, जिल्हा बौद्ध पद्धतीने मंगल परिणय संपन्न उपाध्यक्ष (पर्यटन व प्रसार) अॅड. हणुमंत कांबळे, बीड तालुका अध्यक्ष राजेंद्र ससाणे, बीड तालुका संस्कार अध्यक्ष प्रा. गौतम खेमाडे, सेवानिवृत्त ए.पी.आय. भास्कर कांबळे, प्रा. साठे, बाबूराव गालफाडे, समता सैनिक रत्नाकर निकाळजे, अशोकराव निकाळजे,किशोर निकाळजे तसेच ता. आष्टी येथील

भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतभूमी ही भगवान बुद्धांची भूमी असून अडीच हजार वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात बौद्ध धम्माची समतेची परंपरा नांदत होती. बौद्ध धम्मात सामाजिक असमानता, विषमता व शोषणाला थारा नव्हता. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून समाजाला समतेचा,स्वाभिमानाचा आणि मानवतेचा मार्ग

दाखवला.आज अनेक कुटुंबे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध पद्धतीने विवाह सोहळे संपन्न करत आहेत. त्याच धर्तीवर आष्टी तालुक्यातील पवार आणि पाटोदा तालुक्यातील साठे कुटुंबीयांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून समतेचा संदेश देणारा विवाह सोहळा सन्मानाने पार पाडला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल दोन्ही कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.