महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन आहे - श्रीमती.आसराबाई जैन

 *महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन आहे - श्रीमती.आसराबाई जैन*.



          

       *महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन आहे.असे मत वेळापूर मुली शाळेतील शिक्षिका श्रीमती आसराबाई जैन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त वेळापूर मुली शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह उद्घाटन समारंभ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले*.

      *प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थीनीची प्रभात फेरी काढली.* 

     *यावेळी बोलताना श्रीमती आसराबाई जैन म्हणाले की, शिक्षणाने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो,त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. आणि आर्थिक स्वावलंबन साध्य होते*. *आज अनेक महिला उच्च पदावर आहेत शिक्षक शास्त्रज्ञ,उद्योजक, म्हणून कार्यरत आहेत  शासनाने ही "बेटी बचाव बेटी पढाओ" "यासारख्या योजनाद्वारे  मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलेले आहे. सक्षमीकरण ही केवळ महिलांची गरज नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे*.

      *यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी सृष्टी गाडेकर  हिने विद्यार्थिनींनी शिक्षण का घ्यावे याचे महत्त्व विशद केले*.

     *कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कविता आवटे यांनी केले*.

    *कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.युन्नूस तांबोळी,श्री. जीवन रणनवरे श्री. पांडुरंग कुलकर्णी, श्री. नितीन चव्हाण श्री प्रवीण कुमार पांगे आदी उपस्थित होते* .

     *यावेळी महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त महिलामध्ये जनजागृती, विविध स्पर्धा,व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.