युवा नेते रविदादा कापुरे या उभरत्या नेतृत्वाचा वाढदिवस उत्साहात साजरा.

 युवा नेते रविदादा कापुरे या उभरत्या नेतृत्वाचा वाढदिवस उत्साहात साजरा.




लोहा,प्रतिनिधी , चंद्रकांत वाघमारे 

लोहा येथील वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय संविधान कॉम्प्लेक्स येथे आयोजित

उन्नतीशील महिला मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व राजीव सेंटर व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राचे प्रोजेक्ट डायरेक्टर रवीदादा कापुरे यांच्या वाढदिवसाच्या आयोजन करण्यात आले.

लोहा शहरातील युवा तरुणांच्या प्रत्येक समस्येला धावणारा  रविदादा कापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला.लोह्यातील युवा तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात फटाकड्यांच्या आतिषबाजी सहित केक कापून वाढदिवस साजरा  करण्यात आला. लोहा शहरात लहान वयापासून मित्राचा गराड्यात वावरणारे सर्वाचे जिगरी मित्र, लोकहिताच्या कामामुळे जनतेचे सेवक बनलेत.छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविदादा कापुरे  यांनी वेगळेपण जपत एक वलयं तयार केले आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजहिताची कामे करण्यात ते सदैव अग्रेसर असतात. कोणाच्याही सुख दुःखात धावून जाण्याची ख्याती. सामान्यतल्या सामान्य लोकासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून रविदादा कापुरे यांच्याकडे बघितले जाते. लोहा शहरातील भविष्यातील नेते भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा युवा नेत्याचा दि.8मार्च2026 रोजी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरात वाढदिवसानिमित्त सामाजहिताची कामातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्र परिवरातून नेहमी केला जातो आहे.


चौकट 

वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा.


8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व उन्नतिशील महिला मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित बहुजन आघाडी यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व रविदादा शंकरराव कापुरे प्रोजेक्ट डायरेक्टर राजीव हेल्थ व्यसन मुक्ती पुनर्वसन केंद्र लोहा यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा या निमित्ताने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित नगरपालिका व महानगर पालिकांच्या नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक यांचा सत्कार सोहळ्याची आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडीचे लोहा तालुका अध्यक्ष बी.बी.गायसमुद्रे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार, वाय.बी. महाबळे, पुष्पलता शंकरराव कापुरे अध्यक्ष महिला मंडळ नांदेड ,अनिल दादा गायकवाड सक्रिय कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी, ज्योती कालिदास सावळे सचिव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती लोहा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला होता त्यामध्ये अशोक पाईकराव ,रंजना पाईकराव तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलाचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मनीषा तुळशीराम ढगे व सरिता देवेश महाबळे माता रमाई महिला मंडळात विशेष काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला संघमित्रा महाबळे, सुनंदा माधव कापुरे, मोनिका भोळे,कमल चांदू कापुरे ,संगीता ढवळे ,मीना गायकवाड,मस्के मॅडम जिजाबाई शेषराव महाबळे, सुमनबाई महाबळे ,राजेश्वरी रवी कापुरे, रुक्‍मीनबाई जोंधळे यांचा सत्कार करण्यात आला



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.