Crime news अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, कीर्तनकार गुंजाळ महाराजाला अटक

 Crime news अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, कीर्तनकार गुंजाळ महाराजाला अटक



अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातून वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यानं एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून वाईट नजर ठेवत वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या भोंदू महाराजाने मुलीला गरम लोखंडी पक्कडने चटके देऊन अमानुष अत्याचार केल्याचे  फिर्यादीत नोंदवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कीर्तनकार गुंजाळ महाराज याला अटक केली आहे. 

अध्यात्माचा बुरखा पांघरून एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार कराणारा नराधम कीर्तनकाराचा खरा चेहरा समोर आला आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष ’यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी आठवीत असल्यापासून अत्याचाराचा हा सिलसिला सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे, पीडितेचा भाऊ आरोपीच्याच संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा तो तिच्यावर बळजबरीने अत्याचार करत असे.

मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,’ अशी धमकी देऊन भोंदू महाराज धमकी देत असे. पीडिता घरी एकटी असली की आरोपी हा वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत असे. कुटुंबाला काही होऊ नये म्हणून पीडितेला हा छळ अनेक वर्ष गुपचूप सहन करावा लागला.

काही दिवसांपूर्वी या नराधमाने पीडितेला फोन करून घरी बोलावले मात्र मुलीने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पक्कड गरम करून तिच्या शरीरावर अमानुषपणे चटके दिले. या भीषण छळानंतरही त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली.

​25 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने पीडितेने मागील पाच वर्षांपासून आपल्यावर सुरू असलेल्या अत्याचाराची सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. 

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पारनेर पोलिसांनी आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पहाटे चार वाजता ढवळापूरी येथील राहत्या घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धर्माच्या नावाखाली वावरणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळीमा फासणार्या या कीर्तनकाराने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.