भगवान महावीर स्वामींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा ------------ "त्रिशाला नंदन वीर की जय बोलो महावीर की," जयघोषात कडा नगरी दुमदुमली

 भगवान महावीर स्वामींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
------------
"त्रिशाला नंदन वीर की जय बोलो महावीर की," जयघोषात कडा नगरी दुमदुमली



--------------

कडा / वार्ताहर

---------------

"अहिंसा परमो धर्म" ची जगाला शिकवण देणाऱ्या त्रिशला नंदन वीर भगवान महावीरांची जयंती कडयात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात  साजरी करण्यात आली. महावीरांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी जैन मंदिरात ध्वजारोहण करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीरांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेली पालखी व रथातून ग्रामदक्षिणा करीत सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महावीरांचा जयघोष करीत जैन श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


आष्टी तालुक्यातील कडा येथे मंगळवारी सकाळी अहिंसेचे पुजारी भगवान महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मकल्याणात महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन मंदिरात सकाळी जैन बांधवांकडून ध्वजारोहण, अभिषेक झाल्यानंतर महावीरांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी व अश्व रथातून ग्रामदक्षिणा करीत शांततेत सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी "त्रिशाला नंदन वीर की जय बोलो महावीर की," असा शोभायात्रेत गगनभेदी जयघोष करण्यात आला. या शोभायात्रेत जैन बांधवांकडून मिठाई, थंड पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. तर जैन स्थानकात विविध कार्यक्रमासह नवकार महामंत्राचा सामूहिक जापसह भगवान महावीरांवर आधारित सांस्कृतिक नाटिका सादर करण्यात आली. या सवाद्य शोभायात्रेत शहरातील जैन श्रावक- श्राविका भक्तिमय वातावरणात स्वामीजींचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

------------%------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर